पंतप्रधान मोदी व्यस्त असावेत म्हणूनच ते माझ्या शपथविधिला आले नाहीत : केजरीवाल 

पंतप्रधान मोदी व्यस्त असावेत म्हणूनच ते माझ्या शपथविधिला आले नाहीत : केजरीवाल 

नवी दिल्ली : मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधि सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण खुद्द अरविंद केजरीवाल यांनी देऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केजरीवालांच्या शपथविधिला अनुपस्थित राहिले. 

शपथविधी सोहळा झाल्यांनंतर जनतेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र ते व्यस्त असावेत. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. 

दिल्ली विधानसभेची निवडणूक आप विरूद्ध भाजप अशीच गाजली. येथे केजरीवालांचा पराभव करून भाजपला सत्ता हस्तगत करायची होती. भाजपने आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह बड्या नेत्यांनाही दिल्लीच्या मैदानात उतरविले होते.

केजरीवालांना भाजप नेत्यांनी लक्ष्य करून त्यांना देशद्रोही ठरविण्यापर्यंत मजल गेली होती. मात्र केजरीवालांनीही शांतपणे प्रचार करून विकासकामांकडे दिल्लीकरांचे लक्ष वेधले आणि सत्ता खेचून आणली. 

आपला दणदणीत विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज मुख्यंमत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्याला हजारो कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र पंतप्रधान मोदी या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. याचीच चर्चा दिल्लीत सुरू होती. 

देशात ज्या राज्यात बिगर भाजप सरकार सत्तेवर आले तेथे तेथे केजरीवालांनी शपथविधि समारंभाला उपस्थिती लावली आहे. मात्र दिल्लीत तिसऱ्यांदा सत्ता मिळताच त्यांनी अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना शपथविधिसाठी निमंत्रण दिले नव्हते.

केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच निमंत्रण दिले होते तरीही ते आले नाहीत. त्यांचा उत्तरप्रदेशचा दौरा पूर्वनियोजित असल्याने ते उपस्थित राहिले नाहीत असेही सांगितले जाते. मात्र जर ठरविले असते तर ते शपथविधिला जाऊ शकले असते. 

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची, तर इतर सहा नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनासह दिल्लीच्या विकासात योगदान देणाऱ्या डॉक्‍टर, रिक्षा चालक, सफाई कर्मचारी, कामगार, बस मार्शल अग्निशमन दलाचे जवान आदींना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. 

दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, राजेंद्र पाल गौतम, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मनिष सिसोदिया यांनी मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री काम पाहिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com