`महाराष्ट्राला सहकार्य करण्याचे मोदींचे आश्वासन'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये महाराष्ट्राला सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
pm give assurance of help to maharashtra says cm thackeray
pm give assurance of help to maharashtra says cm thackeray

पुणे - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये महाराष्ट्राला सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. 

ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आज प्रथमच दिल्ली दौरा केला.  यावेळी त्यांनी पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांशी `आवश्यक गोष्टीं'वर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. 

राजकारण आपल्या ठिकाणी आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, की आवश्यक विषयांवर केंद्राचे सहकार्य मिळेल. केंद्र-राज्य समन्वयात सर्व गोष्टी आल्याचे त्यांनी नमूद केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com