`130 कोटींच्या सामूहिक शक्तीची भव्यता, दिव्यता यांचा अनुभव 9 मिनिटांत घ्यावा...`

रस्त्यावर न येण्याचीही मोदी यांची आवर्जून सूचना...
narendra modi
narendra modi

नवी दिल्ली  : येत्या रविवारी म्हणजे 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनीटे देशवासीयांनी घरातील विजेचे सर्व दिवे  बंद करून आपापल्या घरांच्या दरवाजात, बाल्कन्यांमध्ये उभे रहावे व दिवे, पणत्या, मोबाईलचे दिवे लावून कोरोना विरूध्द सुरू असलेल्या लढाईला बळ द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

नागरिकांना उद्देशून आज सकाळी 9 ला केलेल्या छोटेखानी भाषणात मोदींनी हा प्रतीकात्मक उपाय सांगितला. या कोट्यवधी दिव्यांच्या प्रकाशात प्रत्येकाने हा कृतसंकल्प करावा की या महासंकटकाळी आमच्यातील कोणीही एकटा नाही असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी, या अनोख्या दीपोत्सवात कोणीही रस्त्यावर येऊन गर्दी करू नये, असे सांगताना मोदींनी जनता कर्फ्यू वेळी अनेकांच्या अंगात आलेल्या उन्मादी वृत्तीलाही चिमटा काढला. 

जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतातल्या बहुतांश राज्यात हातपाय पसरले आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा २००० च्या पुढे गेला आहे. कोरोनाचा सामूहिक फैलाव रोखण्यासाठी सर्व राज्यांच्या सरकारांसह केंद्र सरकारने मोठी पावले उचलली आहे. मोदी यांच्या आवाहनानुसार  24 मार्चपासून 21 दिवसांसाठी देशात लॉकडाऊनजाहीर करण्यात आला असून कोट्यवधी नागरिक आपापल्या घरांतच थांबून आहेत. या काळात हातावर पोट असणाऱ्या गरिबांचे जे हाल होत आहेत त्याचीही वेदना पंतप्रधानांनी बोलून दाखवली. 

पंतप्रधान म्हणाले : 
- कोरोनाच्या अंधःकारमय संकटाला पराभूत करण्यासाठी आपल्याला प्रकाशाचे तेज चारही दिशांना पसरवले पाहिजे.
- जनता कर्फ्यूच्या दिवशी सायंकाळी पाचला घंटी वाजवून, थाळ्या वाजवून लोकांनी दाखवून दिले की, कोरोना व्हायरसविरोधात देश एक होऊन लढू शकतो.
- आपण लॉक डाऊनदरम्यान घरात आहोत. हे सर्व कठीण आहे. पण 130 कोटी देशवासीयांनी सामूहिक शक्तीचा हा अभूतपूर्व अविष्कार घडवून जगाला दाखवून दिले.
- या 9 मिनीटांत सकारात्मक विचार करा, भारतमातेचे स्मरण करा. गरीबांना निराशेतून आशेकडे न्यायचे आहे.
- मात्र या वेळी सोशल डिस्टन्ससिंग नियमांची लक्ष्मणरेषा ओलांडू नये.
-  लाॅकडाऊन काळात प्रत्येकाने130 कोटींच्या सामूहिक शक्तीची भव्यता, दिव्यता यांचा अनुभव या 9 मिनीटांत घ्यावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com