५ एप्रीलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे 'हे' करा..पंतप्रधानांचे आवाहन

येत्या ५ एप्रीलला रात्री नऊ वाजता घरातले सर्व दिवे बंद करा. घराच्या दारात, बाल्कनीत, गच्चीवर उभे राहून हातात मेणबत्ती, दिवा, किंवा मोबाईल टाॅर्च लावून नऊ मिनिटे स्तब्ध उभे रहा. त्यामुळे प्रकाशाच्या माध्यमातून कोरोनाची लढाई जिंकण्याचे बळ येईल. मात्र हे करताना रस्त्यावर येऊ नका, गल्लीबोळात जमू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे
PM Narendra Modi Once again Appeals to Nation about fight with Corona
PM Narendra Modi Once again Appeals to Nation about fight with Corona

पुणे : देशभरात कोरोनामुळे भितीचे वातावरण आहे. प्रत्येकाला काळजी आहे पुढची...उद्या काय होणार याची. एकटेपणाची जाणीव आज प्रत्येकात आहे. पण कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण एकटे नाही याची जाणीव स्वतःला करुन देण्यासाठी येत्या ५ एप्रीलला रात्री नऊ वाजता काय करायचे याचा फंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून सांगितला.

पंतप्रधानांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून देशाशी संवाद साधला. या लढ्यात लढणाऱ्या, घरात राहून कोरोना दूर ठेवणाऱ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या सर्वांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. याच बरोबर कोरोनाच्या अंधःकारात प्रकाश दाखविण्यासाठी आणि देशाची ताकद दाखवण्यासाठी एक आवाहनही केले.

काय म्हणाले पंतप्रधान....

येत्या ५ एप्रीलला रात्री नऊ वाजता घरातले सर्व दिवे बंद करा. घराच्या दारात, बाल्कनीत, गच्चीवर उभे राहून हातात मेणबत्ती, दिवा, किंवा मोबाईल टाॅर्च लावून नऊ मिनिटे स्तब्ध उभे रहा. त्यामुळे प्रकाशाच्या माध्यमातून कोरोनाची लढाई जिंकण्याचे बळ येईल. मात्र हे करताना रस्त्यावर येऊ नका, गल्लीबोळात जमू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com