अजित पवार म्हणाले, `आरं थांब! एखादा पैलवान आपल्याला चितपटच करेल'

...
ajit-pawar-kaka-pawar
ajit-pawar-kaka-pawar

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतःच्याच स्टाईलने केलेल्या वक्तव्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना बिनधास्त आणि सहजपणे वक्तव्य करत मनमुराद हसवतात. असाच अनुभव आंबेगावमधील कार्यक्रमात पैलवानांना आला. भाषण सुरू असताना कार्यकर्त्याने दिलेली उत्स्फूर्त घोषणा आणि त्यावर लागलीच अजितदादांनी दिलेला प्रतिसाद उपस्थितांना खळखळून हसवून गेला.

महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर, उप-महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि पोलीस उपअधीक्षक पैलवान राहुल आवारे यांच्या खास सत्कार अजितदादांच्या हस्ते करण्यात आला. अर्जुन पुरस्कार विजेते वस्ताद काकासाहेब पवार यांच्या कुस्ती संकुलाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

त्यात झालं असं की, या कार्यक्रमात काकासाहेब पवार यांच्या नावाचा धागा पकडत अजितदादा म्हणाले, 'इथे आल्यावर अनेक पवार भेटले. त्यामुळे कळाले, की आम्ही पवार फक्त राजकारणाचे मैदानच नाही. तर कुस्तीचेही मैदान गाजवत आहोत'. त्यावर लगेचच खालून एका उत्स्फूर्त कार्यकर्त्याने 'एकच वादा, अजितदादा...' अशी मोठ्या आवाजात घोषणा दिली. त्यावर अजितदादा लगेचच म्हणाले, 'आरं थांब... एखाद्या पैलवानाने घेतल्यावर आपल्याला चितपटच करेल'. अजितदादांचे वक्तव्य संपते ना संपतेच, त्यावर पैलवानांमध्ये जोरदार हशा पिकला.

कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर अजितदादांचा गदा देऊन सत्कार करण्यात आला. त्यावरही त्यांनी केलेले खुमासदार वक्तव्य हशा पिकवून गेले. भाषणाला सुरुवातीलाच अजितदादा म्हणाले, 'गदा ही जिंकलेल्या पैलवानाला दिली जाते. पण कधीही कुस्तीचा लंगोट न नेसलेल्या अजित पवारला आज गदा दिली गेली. आम्हाला आजपर्यंत तलवार दिली गेली, गदा पहिल्यांदाच मिळाली. त्यामुळे कुठे ठेवावी, कशी धरावी कळत नव्हती'.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com