पर्यावरण मंत्र्यांच्या कार्यक्रमातून प्लॅस्टिक लावलेले बुके हटविले

पर्यावरण मंत्र्यांच्या कार्यक्रमातून प्लॅस्टिक लावलेले बुके हटविले


परभणी : राज्यात प्लास्टिक बंदी असल्याने पर्यावरण मंत्राच्या परभणीतील कार्यक्रमातून प्लास्टिक गुंडाळलेली फुलांची बुके हटविण्यात आली. सेलू (जि. परभणी) येथील कार्यक्रमात शिवसेना पदधिकाऱ्यांनी प्लॅस्टिक लावलेले बुके स्वागतासाठी दिल्याने मंत्री रामदास कदम संतप्त झाले. त्या नंतर परभणीतील कार्यक्रमातून तातडीने अशी फुलांची बुके हटविण्यात आले. 

सेलू व परभणी येथे शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसेना विमा मदत केंद्राचे उदघाटन व शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम आले होते. दुपारी 1 वाजता सेलू येथे कार्यक्रम होता. त्या ठिकाणी मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी पदाधिकारी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फुलांचे बुके आणले होते. त्यातील काही बुके प्लस्टिकच्या आवरणात होते. असे बुके समोर आनताच मंत्री कदम संतापले. राज्यात प्लास्टिक बंदी आहे हे माहीत असू द्या असे सांगत हे बुके स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. शिवसेना नेते संतापले म्हणल्यावर कार्यकर्त्यांसह पदाधिकार्याची त्रेधातिरपीट उडाली. परभणीतील कार्यक्रमात जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा जिल्हाप्रमुख विशाल कदम, विधानसभा प्रमुख माणिक पोंढे यांनी जातीने यात लक्ष घालून प्लास्टिकचे आवरण असलेले बुके हटविले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com