औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांना प्लॅस्टिकचे कव्हर असलेला बुके दिला, मनपा आयुक्तांकडून दंड ...

स्वागतासाठी विविध जिल्ह्यांतून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी ठाकरे थांबलेल्या एका हॉटेलात गर्दी केली होती. यापैकी अनेकांनी पुष्पगुच्छासाठी प्लॅस्टिकचा वापर केला होता. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय बैठकीसाठी गेले असता, हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी सोबत असलेले स्वीय सहायक शंकर मरापे यांना दंडाची पावती देण्याचे आदेश दिले. त्यांनी जालन्याचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव व लातूरचे तालुकाप्रमुख रमेश पाटील यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची पावती देत दंड वसूल केला.
 औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांना प्लॅस्टिकचे कव्हर असलेला बुके दिला, मनपा आयुक्तांकडून दंड ...

औरंगाबाद : महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेतल्यापासून प्लॅस्टिकबंदी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. महापालिका अधिकारी, भाजप नगरसेविकेला दंड लावल्यानंतर शुक्रवारी (ता.10) मुख्यमंत्र्यांना प्लास्टकीचे कव्हर असेलला बुके देणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांनी दंड ठोठावत आपला खाक्‍या दाखवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी प्लॅस्टिक कव्हर असलेले पुस्तक व पुष्पगुच्छ घेऊन हॉटेलमध्ये जालना व लातूर येथील पदाधिकारी आले होते. पांडेय यांच्या लक्षात हे येताच त्यांनी पाचशे रुपयांचा दंड आकारत तो वसुलही केला. 

महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरात प्लॅस्टिकबंदीची कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी स्वागतासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्याला त्यांनी पाच हजार रुपयांचा दंड केला होता. त्यानंतर भाजप नगरसेविकेने पेनची भेट देताना प्लॅस्टिक कव्हर वापरले म्हणून त्यांच्याकडून पाचशे रुपये दंडापोटी वसुल केले. 

दरम्यान, आयुक्तांच्या कार्यतत्परतेचा फटका जालना व लातूर येथून आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्यातील जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी दोन दिवस शहरात होते. त्यांच्या स्वागतासाठी विविध जिल्ह्यांतून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी ठाकरे थांबलेल्या एका हॉटेलात गर्दी केली होती. यापैकी अनेकांनी पुष्पगुच्छासाठी प्लॅस्टिकचा वापर केला होता. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय बैठकीसाठी गेले असता, हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी सोबत असलेले स्वीय सहायक शंकर मरापे यांना दंडाची पावती देण्याचे आदेश दिले. त्यांनी जालन्याचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव व लातूरचे तालुकाप्रमुख रमेश पाटील यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची पावती देत दंड वसूल केला. 

अनेकांनी फेकले प्लॅस्टिक 
आयुक्तांच्या या कारवाईनंतर अनेकांनी पुष्पगुच्छांना असलेले प्लॅस्टिक काढून ते डस्टबीनमध्ये टाकले. या प्रकारानंतर आयुक्तांनी प्लॅस्टिक असलेले पुष्पगुच्छ घेऊन कोणी आल्यास तुमच्यावरही कारवाई केली जाईल, अशी तंबीही दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com