रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचा दणका, 50 अधिकारी एका झटक्‍यात दिल्लीबाहेर !

अक्षरशः एकसारखे काम करण्यासाठी 50-50 अधिकारी कशाला या वस्तुनिष्ठ प्रश्‍नाचे उत्तर अखेर कागदावरून प्रत्यक्षात उतरले आहे. प्रभू यांच्या काळातील विवेक देबरॉय समितीने 2015 मध्ये रेल्वे बोर्डाच्या फेररचनेची तत्काळ गरज असल्याची शिपारस केली होती. रेल्वे भवनात हजारो कर्मचारी आहेत व रेल्वेचा पसारा देशभरात पसरलेला असला तरी एकट्या दिल्लीत इतक्‍या मनुष्यबळाची गरज आहे का, असाही सवाल त्या समितीने उपस्थित केला होता.
रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचा दणका, 50 अधिकारी एका झटक्‍यात दिल्लीबाहेर !

नवी दिल्ली : दिल्लीच्या रेल्वे बोर्डातील तब्बल 50 अधिकाऱ्यांची एका झटक्‍यात बदली करण्यात आली आहे. या साऱ्या जणांना वातानुकूलीत दालनांचा त्याग करून रेल्वेच्या 16 विभागांत जाऊन प्रत्यक्ष "फील्ड' वर काम करावे लागणार आहे. हा आदेश तत्काळ अंमलात आलेला आहे. सध्या रेल्वे बोर्डात 200 अधिकाऱ्यांची फौज आहे. कार्यक्षमतेच्या निकषावर यातील 50 जणांना दिल्लीतून हलविल्यावरही 150 अधिकारी येथे राहतील. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मंजूर केलेल्या व संचालक अन्विता सिन्हा यांची सही असलेला हा आदेश सध्या खळबळ माजवणारा ठरला आहे. 

रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांची गर्दी कमी करून र्कायक्षम व कामाच्या प्रमाणातच अधिकारी दिल्लीत रहावेत ही कल्पना अटलबिहारी वाजपेयी सरकारची व सन 2000 मधली...! मात्र रेल्वेतील बाबूशाहीचा अदृश्‍य पण प्रचंड दबाव पाहता कोण्याही सरकारला वा रेल्वेमंत्र्यांना त्याची अंमलबजावणी करता न आल्याचेही बोलले जाते. रेल्वे बोर्डात स्वच्छतेचा झाडू फिरविण्याचा मनोदय बोलून दाखविणाऱ्या सुरेश प्रभूंचे मंत्रीपद ज्या पध्दतीने गेले ते पाहिल्यावर तर या चर्चेला बळच मिळाले. मात्र नंतर थेट पीएमओनेच या योजनेची सूत्रे हाती घेतली. सुमारे दोन दशके कागदावर राहिलेली ही योजना "...तो मुमकीन है' च्या श्रेणीत आणताना मोदी सरकारने मोठा दबाव व यातून निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचाही धोका पत्करण्याची हिंमत दाखविल्याची चर्चा आज रेल्वे भवनात होती. 

अर्थात या बदल्या व्यक्तीनिहाय नव्हे तर रेल्वे विभागांतील अधिकाऱ्यांच्या गरजेनुसार झाल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. गोयल यांनी आपल्या 100 दिवसांच्या अजेंड्यातही या बदल्यांचे सूतोवाच केले होते. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार "नोकरशाहीच्या हत्तीचा आकार कमी करणे' या अजेंड्यानुसार रेल्वेतील ही पहिली किमोथेरपी पार पडली आहे. बदल्या झालेल्या पन्नास अधिकाऱ्यांत किमान वरिष्ठ वा मुख्य व्यवस्थापक व त्याच्या वरच्या श्रेणीतील अधिकारी आहेत. यातील बहुतांश जण एकाच प्रकारचे काम करत असल्याचेही वास्तव समोर आले होते. 

अक्षरशः एकसारखे काम करण्यासाठी 50-50 अधिकारी कशाला या वस्तुनिष्ठ प्रश्‍नाचे उत्तर अखेर कागदावरून प्रत्यक्षात उतरले आहे. प्रभू यांच्या काळातील विवेक देबरॉय समितीने 2015 मध्ये रेल्वे बोर्डाच्या फेररचनेची तत्काळ गरज असल्याची शिपारस केली होती. रेल्वे भवनात हजारो कर्मचारी आहेत व रेल्वेचा पसारा देशभरात पसरलेला असला तरी एकट्या दिल्लीत इतक्‍या मनुष्यबळाची गरज आहे का, असाही सवाल त्या समितीने उपस्थित केला होता. 

बदल्या झालेल्यांमध्ये रेल्वेच्या विविध श्रेणींचे अधिकारी आहेत. रेल्वे सुरक्षा दलाचा-आरसीएफचा 1 अधिकारी यात असून आयआरएसई व आयआरटीएस चे प्रत्येकी 10,आयआरएसएमईचे 6,आयआरएसईई व आयआरएसएसईचे प्रत्येकी 5,आयआरएसएस व आयआरपीएसचे प्रत्येकी तीन तीन अधिकारी दिल्लीबाहेर हलविण्यात आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com