जनतेतून सरपंच होण्याचा पहिला मान भाजपच्या पियुषा दगडे यांना! 

जनतेतून सरपंच होण्याचा पहिला मान भाजपच्या पियुषा दगडे यांना! 

पौड : जनतेतून निवडुन आलेली पुणे जिल्ह्यातील पहिली महिला सरपंच होण्याचा मान भारतीय जनता पक्षाच्या बावधन गावातील पियुषा किरण दगडे पाटील यांना मिळाला. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत पियुषा यांनी 40 मतांची आघाडी घेत आज विजय मिळवला. पियुषा यांना 2300 आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रतिक्षा दगडे यांना 2260 मते मिळाली. 

या निवडणुकीकडे मुळशी तालुक्‍याचे लक्ष लागले होते. पुण्यानजिकच असलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असल्याने येथील ग्रामपंचायतीला महत्त्व आले आहे. पुणे महापालिकेचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या पियुषा या पत्नी आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेवरून भाजपचे आमदार भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी यांनीही या गावात येऊन परिवर्तन पॅनेलचा प्रचार केला होता. त्यामुळे येथील निवडणूक चर्चेची झाली होती. 

माजी सरपंच बबनराव दगडे, पोलीस पाटील बबनराव दगडेपाटील, राहुल दुधाळे, बापुसाहेब दगडे, सुनील दगडे यांनी बापुजीबुवा परिवर्तन पॅनेल तयार केले होते. भाजप, शिवसेना व रिपाई या पक्षांनी हे पॅनेल पुरस्कृत केले होते. 

दुसरीकडे विद्यमान सरपंच निलेश दगडे, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, दिलीप दगडे, सुदाम दगडे, सुदाम भुडे आदींनी विकास पॅनेल उभे केले होते. या पॅनेलला 17 पैकी दहा जागा मिळाल्या. परिवर्तन पॅनेलला सात जागांवर समाधान मानावे लागले. जिल्ह्यात भाजपचे थेट सरपंचपदाचे खाते बावधनने उघडून दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com