कोल्हापूर : पाईप लाईनच्या वादात शकुनीमामा , दुर्योधन आणि सरदारांचा उध्दार 

कोल्हापूर : वीस लाखांचा साकव 20 कोटीचा कसा झाला ? या कामात कोणी किती ढपला पाडला ? यासारखे प्रश्‍न विचारून महापालिकेतील विरोधातील भाजपा आघाडीने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. हे करत असताना नगरसेवकांपेक्षा नेत्यांवरच तोंडसुख घेतले जात आहे.त्यातून सतेज पाटील यांना "बावड्याच सरदार', महाडीक यांना "शिरोलीचा शकुनीमाना', नगरसेवक सत्यजित कदम यांना "दुर्योधन' यासारी विश्‍लेषण लावली जात आहेत. वाद थेट पाईपलाईनचा पण वैयक्तीक पातळीवर सुरू असलेल्या टीकेने चांगलीच करमणूक सुरू आहे
SATEJ-PATIL-MAHADEO-MAHADIK
SATEJ-PATIL-MAHADEO-MAHADIK

कोल्हापूर: शहराच्या थेट पाईप लाईन योजनेवरून महापालिकेतील सत्तारूढ व विरोधी आघाडीकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपातून एकमेकांची उणीदुणी काढण्याचे काम सुरू आहे. 

योजना रखडलेली आहे, काम संथगतीने सुरू असताना सुरू झालेल्या या वादात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरूध्द माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्यातील वाद समर्थकांच्यामार्फत पुन्हा चव्हाट्यावर येत आहे. 


बावड्याचा सरदार, शिरोलीचा शकुनीमामा, दुर्योधन अशी विश्‍लेषणे लावून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातून कोण कोणत्या प्रकरणात गुंतला आहे, कोणी किती रूपये खाले, कुणाची संपत्ती कुणी लाटली असे धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. लोकांची मात्र यातून चांगलीच करमणूक सुरू आहे. 


शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी पुरवठा व्हावा ही 35 वर्षाची मागणी होती. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात ही योजना मंजूर झाली नाही तर आमदरकी न लढवण्याचा इशारा तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला होता. 


 सरकारी पातळीवरील सततचा पाठपुरावा, राज्यात व देशातही कॉंग्रेस आघाडीचे सरकार यातून 2014 ला योजनेला मंजुरी मिळाली. पण "नकटीच्या लग्नाला सतराशेहे विघ्ने' अशीच या योजनेची आजची स्थिती आहे.

निधी आलाय, कामही सुरू झाले पण काही महत्त्वाच्या परवानग्या वेळेत न मिळाल्याने काम रखडले आहे. योजना पूर्ण व्हायची मुदत संपली असताना आता यातील गैरव्यवहारावरून नगरसेवकांच्या आडून नेत्यांत जुंपली आहे. 

वीस लाखांचा साकव 20 कोटीचा कसा झाला ? या कामात कोणी किती ढपला पाडला ? यासारखे प्रश्‍न विचारून महापालिकेतील विरोधातील भाजपा आघाडीने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. हे करत असताना नगरसेवकांपेक्षा नेत्यांवरच तोंडसुख घेतले जात आहे.

 त्यातून सतेज पाटील यांना "बावड्याच सरदार', महाडीक यांना "शिरोलीचा शकुनीमाना', नगरसेवक सत्यजित कदम यांना "दुर्योधन' यासारी विश्‍लेषण लावली जात आहेत. वाद थेट पाईपलाईनचा पण वैयक्तीक पातळीवर सुरू असलेल्या टीकेने चांगलीच करमणूक सुरू आहे. 

विरोधी भाजपा आघाडीच्यावतीने नगरसेवक सत्यजित कदम यांच्याकडून तर सत्ताधाऱ्यांमार्फत उपमहापौर अर्जुन माने, गटनेते शारंगधर देशमुख यांच्यामार्फत ही पत्रकबाजी सुरू आहे. योजना सुरू होण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज असताना त्यात पैसे किती खाले या आरोपवरून सुरू असलेली टोलेबाजी भलतीकडेच जात आहे एवढे निश्‍चित. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com