Pimpri Standing Committee Passed Crore rupees Subjects in Record Time | Sarkarnama

पिंपरी स्थायी समितीची किमया : अवघ्या 35 मिनिटांत 116 कोटी मंजूर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मंजुरीसाठीचे 66 व ऐनवेळचे नऊ असे सुमारे 116 कोटी 51 लाख रुपयांच्या खर्चाचे तब्बल 75 विषय अवघ्या 35 मिनिटांत मंजूर करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. 15) ही किमया साधली

पिंपरी  : मंजुरीसाठीचे 66 व ऐनवेळचे नऊ असे सुमारे 116 कोटी 51 लाख रुपयांच्या खर्चाचे तब्बल 75 विषय अवघ्या 35 मिनिटांत मंजूर करण्यात आले. महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. 15) ही किमया साधली. 

मंजुरीसाठीच्या 66 पैकी तीन विषय तहकूब करून एक दप्तरी दाखल केला. चार विषयांबाबत प्रशासनाकडून फेरप्रस्ताव मागितला. एक विषय वर्गीकरणाचा; तर एक विषय अवलोकनाचा होता. ऐनवेळचे नऊ विषय तीन कोटी 71 लाख रुपयांचे होते. महापालिकेच्या आयटीआयमध्ये रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग मेकॅनिक व्यवसायाचे नूतनीकरण व अद्ययावतीकरण केले जाणार आहे. यासाठी चार कोटी 70 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्राधिकरणातील गणेश तलावातील गाळ काढणार आहे. महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे सुशोभीकरण केले जाणार आहे.

जलनिःसारणाची कामे

चिखली गावठाण, शेलारवस्ती, सोनवणेवस्ती, कुदळवाडी, बालघरेवस्ती, पवारवस्ती, मोशी, बोऱ्हाडेवाडी, संजय गांधीनगर, बोऱ्हाटेवस्ती, कृष्णानगर, शिवतेजनगर, हरगुडेवस्ती, चिंचवड गावठाण, रस्टन कॉलनी, लक्ष्मीनगर, यशोपुरम, कोकणेनगर, क्रांतिवीरनगर, नढेनगर, राजवाडेनगर, पवनानगर, विजयनगर, चिंचवडेनगर, शिवनगरी, बलवंतनगरी, थेरगाव येथील मंगलनगर, गणेशनगर, बेलठिकानगर, गुजरनगर, सांगवी गावठाण, त्रिमूर्ती कॉलनी, मुळानगर, मधुबन सोसायटी, नवी सांगवीतील कवडेनगर, इंद्रायणीनगर, दापोडी गावठाण, पिंपळे निलख, विशालनगर, वाकडमधील पिंक सिटी रस्ता, वाल्हेकरवाडी, भालके कॉलनी, राजीव गांधी वसाहत.

इंद्रायणीनगर-नाशिक रस्ता जोडणार

भोसरी-प्राधिकरणातील इंद्रायणीनगर आणि पुणे-नाशिक महामार्ग यांना जोडण्यासाठी तीन ठिकाणी रस्त्यांचे आरक्षण आहे. त्यातील तिरुपती चौक येथील तुलसी हाईट्‌ससमोरील रस्ता ते पेठ तीन-लांडगेनगरमधील नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे पाचशे मीटर लांबीच्या रखडलेल्या या रस्त्यासाठीचा खर्चही मंजूर करण्यात आला; तसेच एमआयडीसीतील रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख