आचारसंहिता संपल्याने स्थायीची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने कोटीच्या कोटी उड्डाणे भरण्यास सुरवात केली आहे. बुधवारी ४२ कोटी रुपयांचे ४० विषय ४० सेंकदातच चर्चेविना मंजूर करण्यात आले.दरम्यान, समितीचे सदस्य आणि अध्यक्षच न आल्याने पालिकेचे विभागप्रमुख अधिकार्यांना एक तास या बैठकीसाठी ताटकळत बसावे लागले.
आचारसंहिता संपल्याने स्थायीची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने कोटीच्या कोटी उड्डाणे भरण्यास सुरवात केली आहे. बुधवारी ४२ कोटी रुपयांचे ४० विषय ४० सेंकदातच चर्चेविना मंजूर करण्यात आले.दरम्यान, समितीचे सदस्य आणि अध्यक्षच न आल्याने पालिकेचे विभागप्रमुख अधिकार्यांना एक तास या बैठकीसाठी ताटकळत बसावे लागले.

७० दिवसांच्या आचारसंहितेनंतर स्थायीची ही दुसरी बैठक झाली.मागची स्थगित आणि या आठवड्याची अशा दोन सभांचे कामकाज फक्त २५ मिनिटात झाले. समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी अध्यक्षस्थानी होते. पालिका आयुक्त दिल्ली दौऱ्यावर असल्याने अनुपस्थित होते. तीन महिन्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने स्थायीने कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यास सुरुवात केली आहे. दुपारी सव्वादोन वाजताची ही सभा सव्वातीनला सुरू झाली. पहिले ११ विषय धडाधड एकामागोमाग चर्चा न होता मंजूर करण्यात आले.१२ वा विषय थोडी चर्चा होऊन स्थगित करण्यात आला.तर,नंतरचे असे एकूण १८ कोटी ८१ लाख ८६ हजार रुपयांचे १६ विषय चर्चेविना पटापटा मंजूर केले गेले.पहिल्या सभेचे कामकाज फक्त पाच मिनिटे चालले. १६ पैकी फक्त चार सदस्य बोलले. त्यात सातपैकी उपस्थित पाच महिला सदस्यांपैकी एकच बोलल्या.

दुसरी सभा वीस मिनिटे चालले. त्यात साडेबावीस कोटी रुपयांचे २३ विषय झटपट चर्चेविना मंजूर केले गेले.फक्त दोन विषयावर चर्चा झाली. दोन्ही सभांत शिवसेनेचे सदस्य राहूल कलाटे यांनीच अभ्यासपूर्ण चर्चा करीत अधिकारी तथा प्रशासनाला धारेवर धरले.इतर चौघांनीही दुसऱ्या बैठकीत भाग घेतला 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com