शिवसेना उमेदवार गौतम चाबूकस्वारांचे फेसबूक अकाऊंट हॅक

पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेचे पिंपरी राखीव मतदारसंघाचे उमेदवार व आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार यांचे फेसबुक अकाउंट काल हॅक करण्यात आले. यामुळे त्यांच्या सोशल मिडीयावरील प्रचाराला खीळ बसली. दरम्यान, या अकाउंटवरून विरोधकांना चुकीचा मेसेज पाठविला जाण्याच्या भीतीने आमदारांनी पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार देत याप्रकरणी तातडीने तपास करण्याची मागणी केली. मात्र, काल उशीरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल नव्हता.
Gautam Chabukswar Shivsena Pimpri Candidate
Gautam Chabukswar Shivsena Pimpri Candidate

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेचे पिंपरी राखीव मतदारसंघाचे उमेदवार व आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार यांचे फेसबुक अकाउंट काल हॅक करण्यात आले. यामुळे त्यांच्या सोशल मिडीयावरील प्रचाराला खीळ बसली. दरम्यान, या अकाउंटवरून विरोधकांना चुकीचा मेसेज पाठविला जाण्याच्या भीतीने आमदारांनी पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार देत याप्रकरणी तातडीने तपास करण्याची मागणी केली. मात्र, काल उशीरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल नव्हता.

दरम्यान, मला निवडणुकीत रोखू शकत नसल्याने हा खोडसाळपणा करण्यात आला असल्याचे चाबूकस्वार यांनी याबाबत 'सरकारनामा'ला सांगितले. माझं चांगलं  चाललं होतं, असे ते म्हणाले.एका चायनीज हॅकरने हे कृत्य केले असल्याचे सायबर सेलच्या प्राथमिक तपासात आढळले आहे. पैसे घेऊन व्यावसायिक हॅकर अशी कामे करतात, असे चाबूकस्वार म्हणाले. दरम्यान, यामुळे बदनामी वा चुकीची माहिती या अकाउंटवरून देण्याची भीती असल्याने पोलिसांत तक्रार दिली,असे त्यांनी सांगितले.

येत्या २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी पिंपरीतून चाबूकस्वार हे महायुतीचे उमेदवार आहेत. सोशल मिडियासाठी ते व त्यांचे विश्वासू कार्यकर्ते वापरत असलेले फेसबुक अकाऊंट काल सकाळी हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अकाऊंटवरील मोबाईल नंबर, मेल आयडी, पासवर्ड व नावातही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आमदारांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी तातडीने पोलिस आयुक्तालयातील सायबर क्राईमकडे लेखी तक्रार दिली. दरम्यान, फेसबुक अकाउंट हॅक झाल्याने सोशल मिडियावरील चाबूकस्वारांचा प्रचार ठप्प झाला. त्यामुळे त्यांनी आता एक नव्हे चार अकाउंट उघडण्याची खबरदारी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com