शिक्षक, अधिकाऱ्यामुळे शाळांचा दर्जा घसरला : महापौर राहुल जाधव 

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांतील शिक्षणाच्या घसरत्या दर्जाला शिक्षक व पालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा घरचा आहेर महापौर राहूल जाधव यांनी दिला. दरवर्षी पालिका शाळेतून दहा ते बारा टक्के विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचेही त्यांनी आज सांगितले.
शिक्षक, अधिकाऱ्यामुळे शाळांचा दर्जा घसरला : महापौर राहुल जाधव 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांतील शिक्षणाच्या घसरत्या दर्जाला शिक्षक व पालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा घरचा आहेर महापौर राहूल जाधव यांनी दिला. दरवर्षी पालिका शाळेतून दहा ते बारा टक्के विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचेही त्यांनी आज सांगितले.  

पालिका शाळांचे व तेथील शिक्षणाच्या झालेल्या खेळखंडोबाचे खापर महापौरांनी शिक्षण मंडळावर व अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीवर फोडले. भ्रष्ट कारभारामुळेच राज्य सरकारने ही मंडळे गेल्यावर्षी बरखास्त केली. त्याऐवजी आता शिक्षण समित्या राज्यभर अस्तित्वात आल्या आहेत. गेली 15 वर्षे पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी शिक्षण मंडळ अस्तित्वात होते. भाजप प्रथमच पालिकेत गेल्यावर्षी सत्तेत आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काळातील शिक्षण मंडळ जाऊन यावर्षी समिती स्थापन आली आहे. तिला आधार देणे गरजेचे असल्याने हा उपक्रम हाती घेतल्याचे महापौरांनी सांगितले. 

महापालिका शाळेतील घसरत्या दर्जाला काहीअंशी जबाबदार असलेल्या ठेकेदारांनाही सरळ करणार असून त्यांची मक्तेदारी मोडून काढणार असल्याचा इशारा महापौरांनी दिला आहे. कुणाशीही आपल्या कारकिर्दीत तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट करताना पारदर्शक कारभार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालिका शाळांचा दर्जा वर्षागणिक घसरत चालला आहे. त्याला तेथे दरवर्षी होणारी विद्यार्थी गळती साक्ष आहे. मोफत शालेय साहित्य देऊनही पालक आपल्या पाल्याला पालिका शाळेत प्रवेश घेत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे खासगी शाळेत डोनेशन व अवाच्यासव्वा फी देऊन पालक आपल्या मुलांना प्रवेश घेत आहेत. त्यामुळे हा उपक्रम घेतला आहे. 

पालिका शाळांचा घसरता दर्जा सावरण्यासाठी शाळांची पाहणी महापौर येत्या शुक्रवारपासून (ता.21) करणार आहेत. अशी पाहणी करणारे ते पहिले महापौर आहेत. पालिकेच्या 107 शाळा आहेत. दररोज तीन तास ते पालिका शाळांची पाहणी करणार आहेत. दर्जा सुधारावा असे वाटणाऱ्या सर्वांनी या दौऱ्यात सहभागी होऊन सुचना कराव्यात, असे आवाहन महापौरांनी केले आहे. 

शाळा पाहणी दौऱ्यात विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या अडचणी समजावून घेऊन त्यानुसार उपाययोजना करणार असल्याचे महापौरांनी `सरकारनामा'ला आज सांगितले. आवश्यक तेथे पुरेसा निधी देण्यात येणार आहे. शाळांचा घसरता दर्जा सावरण्यासाठी शाळा,तेथील शिक्षक व पालिकेचा शिक्षण विभाग आणि त्यांचे अधिकारी यांना एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतरही दर्जा सुधारला नाही तर, सबंधितांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com