`#MeToo' नंतर आता `FeeToo'; पिंपरीतील वकिलाची चळवळ 

लैंगिक अत्याचाराची शिकार झालेल्या महिलांच्या `#MeToo' चळवळीपासून प्रेरणा घेत पिंपरी-चिंचवडमधील एका वकिलाने `#MeToo'च्या धर्तीवर `FeeToo' ही मोहीम सुरू केली आहे. या चळवळीत वकिलांची फी बुडविणाऱ्या पक्षकारांची नावे फेसबुकवर प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्याव्दारे वकिलांत जागृती करून त्यांची फसवणूक टाळण्याचा हेतू यामागे असल्याचे ही मोहीम सुरू केलेले "बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवा'च्या शिस्तपालन कमिटीचे सदस्य ऍड. अतिश लांडगे यांनी बुधवारी "सरकारनामा'ला सांगितले.
`#MeToo' नंतर आता `FeeToo'; पिंपरीतील वकिलाची चळवळ 

पिंपरीः लैंगिक अत्याचाराची शिकार झालेल्या महिलांच्या `#MeToo' चळवळीपासून प्रेरणा घेत पिंपरी-चिंचवडमधील एका वकिलाने `#MeToo'च्या धर्तीवर `FeeToo' ही मोहीम सुरू केली आहे. या चळवळीत वकिलांची फी बुडविणाऱ्या पक्षकारांची नावे फेसबुकवर प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्याव्दारे वकिलांत जागृती करून त्यांची फसवणूक टाळण्याचा हेतू यामागे असल्याचे ही मोहीम सुरू केलेले "बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवा'च्या शिस्तपालन कमिटीचे सदस्य ऍड. अतिश लांडगे यांनी बुधवारी "सरकारनामा'ला सांगितले. 

दिवाणी आणि कौटुंबिक न्यायालयापेक्षा फौजदारी न्यायालयातील सराईत गुन्हेगार फी बुडवित असल्याचे वकिलवर्गाचे निरीक्षण आहे. आपल्या बाजूने निकाल लागल्यानंतर या ना त्या कारणाने हे पक्षकार उर्वरित फी देण्याचे टाळतात. अथवा काही पक्षकार हे दुसऱ्या वकिलाकडे जातात. त्यातून पहिल्या वकिलांची फसवणूक होत होती. 

दरम्यान, `#MeToo' प्रकरणानंतर वकिलांची होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी `#FeeToo' मोहीम सुरू झाली आहे. त्यात फी बुडविणाऱ्या अशिलांची नावे बार असोसिएशनकडे देण्यात येणार आहेत. तसेच ती वकिलांच्या इंटर्नल ग्रुपवरही शेअर केली जाणार आहेत. त्यामुळे वकील सावध होऊन त्यांची फसवणूक टळणार आहे. 

यासंदर्भात ऍड लांडगे म्हणाले, "नव्वद पक्षकारांनी माझी दहा ते बारा लाख रुपयांची फी बुडविली आहे. ती आता मिळण्याची शक्‍यता नाही. मात्र, इतर वकिलांची अशी फसगत या `FeeToo' मुळे होणार नाही. अशा भामट्या पक्षकारांची माहिती त्यांना मिळणार असल्याने ते सावध होतील.दोन दिवसांतच दीड हजार वकिलांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. राज्यभरातून फोन येत आहेत. भविष्यात यासाठी फेसबुक पेज सुरू करणार आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com