पिंपरीत घोषणा:  काकडे यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय !

‘खा. संजय काकडे यांचे करायचे काय खाली डोकं वर पाय’, ‘संजय काकडे, माफी मागा, माफी, मागा,’, संजय काकडे मुर्दाबाद, मुर्दाबाद’ अशा घोषणा यावेळी त्यांनी दिल्या.
pankaja-munde- Sanjay kakde
pankaja-munde- Sanjay kakde

पिंपरीः भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी शुक्रवारी पुण्यात केलेल्या  वक्तव्याचे पडसाद शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये उमटले.

विविध ओबीसी संघटनांनी काकडेंविरोधात निषेध आंदोलन करून त्यांच्या जाहीर माफीची मागणी केली. भविष्यात काकडेंनी, जर अशी भाषा वापरली,तर त्यांच्या पुण्यातील निवासस्थानासमोर आंदोलन करू,असा इशाराही यावेळी देण्यात आला.

काकडे हे भाजपचे सहयोगी सदस्य असले तरी भाजपच्या अंतर्गत कार्यप्रणालीवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही,असे जय भगवान बाबा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. गणेश ढाकणे यांनी या निषेध आंदोलनानंतर सांगितले. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार असलेल्या पंकजा यांनी आपले राजकीय कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी पहिले आत्मपरिक्षण करावे,असा सल्ला त्यांनी दिला. 

जय भगवान महासंघ पुणे, भगवान सेना पिंपरी चिंचवड, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, भगवान बाबा प्रतिष्ठान, ओबीसी संघर्ष समिती या संस्थांचे प्रतिनिधी व  ओबीसी संघर्ष समितीचे आंनदा कुदळे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष  चंद्रशेखर भूजबळ, समन्वयक सुरेश गायकवाड, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भगवान बाबा मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद मुंडे सहभागी होते. 

 सामाजिक कार्यकर्ते दत्ता कायंदे, उद्धव सानप, हनुमंत भाजपशिवाजी गिते, नाना खेडकर, महादेव मुसळे, विजय सानप, परमेश्वर दराडे, अरुण गिते, आनंदा खाडे, राजू सानप आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

‘खा. संजय काकडे यांचे करायचे काय खाली डोकं वर पाय’, ‘संजय काकडे, माफी मागा, माफी, मागा,’, संजय काकडे मुर्दाबाद, मुर्दाबाद’ अशा घोषणा यावेळी त्यांनी दिल्या.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com