जुन्या भाजपाईंचा आता वाजपेयी विचारमंच; पिंपरी-चिंचवडमधील एकनिष्ठ पुन्हा एकत्रित

पिंपरी-चिंचवडमधील जुन्या एकनिष्ठ भाजपाईंनी एकजुटीसाठी आता श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी विचारमंचाची स्थापना केली आहे. या मंचाचे औपचारिक उदघाटन आज सायंकाळी होणार असून त्यात पिंपरी महापालिकेसह राज्य महामंडळ व समित्यांवर नियुक्त झालेल्या जुन्या भाजपाईंचा सत्कार केला जाणार आहे.पक्षाच्या शहर अध्यक्षांची मुदत संपल्याने नवीन अध्यक्ष जुना व एकनिष्ठ असावा,यासाठी ही मंचाची मोर्चेबांधणी असल्याचे समजते.
जुन्या भाजपाईंचा आता वाजपेयी विचारमंच; पिंपरी-चिंचवडमधील एकनिष्ठ पुन्हा एकत्रित

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील जुन्या एकनिष्ठ भाजपाईंनी एकजुटीसाठी आता श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी विचारमंचाची स्थापना केली आहे. या मंचाचे औपचारिक उदघाटन आज सायंकाळी होणार असून त्यात पिंपरी महापालिकेसह राज्य महामंडळ व समित्यांवर नियुक्त झालेल्या जुन्या भाजपाईंचा सत्कार केला जाणार आहे.पक्षाच्या शहर अध्यक्षांची मुदत संपल्याने नवीन अध्यक्ष जुना व एकनिष्ठ असावा,यासाठी ही मंचाची मोर्चेबांधणी असल्याचे समजते.

भाजपची बी टीम म्हणून ओळखले जाणारे व राष्ट्रवादीतून आलेले शहर भाजपचे नेते,पदाधिकारी या सोहळ्याकडे पाठ फिरविण्याची दाट शक्यता आहे. तर, आतापर्यंत फक्त व्हाटसअप ग्रुप आणि सहलीतून एकत्र येणाऱ्या जुन्या भाजपाईंना मंचाचे एक व्यासपीठ आता उपलब्ध झाले आहे. नऊ जुन्या भाजपाईंच्या या सत्कार सोहळ्याला तथा वाजपेयी मंचच्या उदघाटनाला चारशे जुन्या जाणत्या एकनिष्ठांनाच आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचा सत्कार शहराच्या माजी अध्यक्षांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि वाजपेयींचे पुस्तक देऊन केला जाणार आहे.तर, हा पक्षाचा कार्यक्रम नसून वाजपेयींचे विचार मान्य असलेले कुणीही येऊ शकते, असे विचारमंचचे एक मुख्य प्रवर्तक राजू दूर्गे यांनी सांगितले. ते प्रमोद निसळ, भीमा बोबडे,माऊली थोरात,मोरेश्वर शेडगे, संजय मंगोडेकर, नंदू भोगले आदी जुन्या कट्टर भाजपाईंनी एकत्र येऊन हा मंच स्थापन केला आहे. 

मंचाचे उदघाटन हे नवनियुक्त पदाधिकारी बनललेल्या जुन्या भाजपाईंचा सत्कार करून केले जाणार आहे.त्यात  राज्यसभेत पुन्हा प्रतोद म्हणून नियुक्ती झालेले अमर साबळे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झालेले अॅड.सचीन पटवर्धन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ गटनेते एकनाथ पवार,स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी,पालिकेच्या नवनिर्वाचित विधी सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, ई प्रभाग समिती अध्यक्षा योगिता नागरगोजे यांचा समावेश आहे, असे मंचाचे दुसरे प्रवर्तक व स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री,तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील हे सुद्धा केंद्रात राज्यमंत्र झाली आहेत. परिणामी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे.पी. नड्डा यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. नवे प्रदेशाध्यक्षही महाराष्ट्राला मिळणार आहे. नवे जिल्हाध्यक्षही नियुक्त होणार आहेत.त्याची मोर्चेबांधणी सध्या ओल्ड इज गोल्ड या दोन व्हाॅटसअप ग्रुपमध्ये असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील जु्न्या भाजपाईंनी मंच स्थापून केल्याचे समजते. नवीन शहराध्यक्ष आपल्यापैकी असावा असा त्यांचा मानस आहे.कारण गेल्या तीन वर्षापासून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजप हा मूळ भाजपाईंकडून निसटला आहे. 

राष्ट्रवादीतून आलेल्यांनी पक्षावर कब्जा केला आहे. सध्याचे शहराध्यक्ष  आमदार हे ही मूळचे भाजपाई नाहीत. प्रथमच पालिकेत सत्तेत आलेल्या भाजपचे बहुतांश पदाधिकारी हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेलेच आहेत. ही सल कुठेतरी जुन्या व एकनिष्ठांना सलत आहे. शहर भाजपमध्ये गट नवे नाहीत. पूर्वी गडकरी व मुंडे अशी गटबाजी होती. नंतर ती जुने व नवे अशी झाली. मात्र, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी नव्यांच्या जोडीने जुन्यांनाही पक्ष संघटनेत आणि पालिकेत सत्तावाटपात संधी देत गटबाजी संपुष्टात आणली आहे. त्यानंतरही हा मंच स्थापन झाल्याने तो शहर भाजपमध्येच नाही,तर राजकारणातही चर्चेचा विषय झालेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com