Pimpri News Ramdas Athavale Appeals To Vanchit Aghadi | Sarkarnama

सत्ता हवी असेल,तर महायुतीत यावे; वंचितच्या घटकांना आठवलेंची साद

उत्तम कुटे
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

राज्यात महायुतीला २८८ पैकी २४० जागा मिळतील,अशी भविष्यवाणी आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  पिंपरी-चिंचवडमध्ये केली. सत्ता हवी असेल, तर वंचित बहूजन आघाडीतील पक्षांनी माझ्याकडे (महायुतीत) यावे, अशी हाक यावेळी देताना त्यांनी वंचितला डिवचत ती आणखी खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. वंचितची अजिबात चिंता वाटत नाही, असेही ते म्हणाले.

पिंपरी : राज्यात महायुतीला २८८ पैकी २४० जागा मिळतील,अशी भविष्यवाणी आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  पिंपरी-चिंचवडमध्ये केली. सत्ता हवी असेल, तर वंचित बहूजन आघाडीतील पक्षांनी माझ्याकडे (महायुतीत) यावे, अशी हाक यावेळी देताना त्यांनी वंचितला डिवचत ती आणखी खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. वंचितची अजिबात चिंता वाटत नाही, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आठ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या भीमसृष्टीचे उदघाटन केल्यानंतर आठवले पिंपरीत बोलत होते. महापौर राहुल जाधव,मावळचे शिवसेना खासदार श्रीरंगअप्पा बारणे, पिंपरीचे आमदार अॅड.गौतम चाबूकस्वार, पिंपरीतील आरपीआयच्या इच्छुक चंद्रकांता सोनकांबळे आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी आठवलेंतील  शीघ्रकवी जागा झाला. 'ही तर आहे भीमसृष्टी, कुणाची पडू नये वक्रदृष्टी' अशी त्यांनी एक समयोजित चारोळी यावेळी केली. महायुतीत घटकपक्षांसाठी सोडण्यात येणाऱ्या १८ जागांपैकी १० साठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. 

''राज्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच नाही,तर वंचितसह इतर कुठल्याही पक्षाला सत्ता मिळणार नसल्याने तेथून आऊटगोईंग, तर भाजपमध्ये इनकमिंग सुरु आहे. म्हणूनच सत्तेसाठी वंचितमध्ये गेलेली 'एमआयएम' बाहेर पडली आहे. त्यामुळे सत्ता हवी असेल, तर त्यांनी माझ्याकडे म्हणजे महायुतीत यावे, सत्ता मिळवायची असेल, तर राज्यात महायुती आणि केंद्रात एनडीए हाच पर्याय आहे. त्यामुळे लोकांनी इकडेतिकडे न जाता दोन्ही कॉंग्रेसची मंडळी जशी  महायुतीत येत आहेत, तसे करावे. फक्त निवडणुकाच लढवायच्या असतील,नतर त्यांनी वंचितमध्ये राहावे,''असे आठवले यावेळी म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख