'मातोश्री'च्या आवतणाला महेशदादांचा प्रतिसाद नाही, भोसरीत पेच

लांडगेहे गतवेळी अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी पाच वर्षात मतदारसंघ बांधला असून त्यावर कमांडही मिळवली आहे. त्यामुळे भाजप,शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही,तरी अपक्ष म्हणून ते पुन्हा निवडून येऊ शकतात, असा विश्वास त्यांच्या एका कट्टर नगरसेवक समर्थकाने व्यक्त केला आहे.
 'मातोश्री'च्या आवतणाला महेशदादांचा प्रतिसाद नाही, भोसरीत पेच

पिंपरी : शिवसेनेकडून मातोश्री भेटीचे निमंत्रण येऊन आठ दिवस उलटल्यानंतरही पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अद्याप त्याला प्रतिसादच दिलेला नाही. त्यामुळे दादा भाजपकडूनच लढण्याची शक्यता वाटते आहे. मात्र,राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडत असल्याने ते धनुष्यबाण हाती घेतात की गतवेळसारखे अपक्ष म्हणून पुन्हा लढतात याचीही चर्चा 'मातोश्री'च्या आवतणामुळे भोसरीतच नाही,तर पूर्ण शहरातच सुरु झाली आहे. 

दरम्यान, लांडगेंनी तूर्त रिप्लाय दिला नसला, तरी मातोश्रीवर त्यांची भेट होऊन चर्चाही होईल,असा विश्वास या भेटीचे आमंत्रण दिलेले शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला. आमदार होण्यापूर्वीपासून आम्ही मित्र असल्याने ही खात्री वाटते आहे, असे ते म्हणाले. आठ दिवसांपूर्वी स्वतः फोनवरून मातोश्री भेटीचे लांडगेंना निमंत्रण दिले असून जमले, तर भेटही घेऊ,असे त्यांनी सांगितले.

लांडगे हे गतवेळी अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी पाच वर्षात मतदारसंघ बांधला असून त्यावर कमांडही मिळवली आहे. त्यामुळे भाजप,शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही,तरी अपक्ष म्हणून ते पुन्हा निवडून येऊ शकतात, असा विश्वास त्यांच्या एका कट्टर नगरसेवक समर्थकाने व्यक्त केला आहे. म्हणूनच शिवसेनेने त्यांना भेटीचे निमंत्रण दिले असल्याचे ते म्हणाले. 

दुसरीकडे भोसरीवर शिवसेनेने क्लेम कायम केला आहे. पूर्वीपासून तेथे शिवसेना लढत असल्याकडे कटके यांनी लक्ष वेधले. युती असताना तेथे शिवसेनेचाच उमेदवार होता,असे ते म्हणाले. म्हणूनच की काय तेथून इरफान सय्यद यांनी शिवसेनेकडून तयारी सुरु केली आहे. त्यामुळे युती झाली,तर तेथे जागावाटपाचा तिढा निर्माण होणार आहे. कारण लांडगे यांचे भोसरीत भाजपकडून लढण्याचे जवळपास नक्की झाले आहे. एवढेच नाही,तर लोकसभेला शिरूरचे भाजपचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्याने भोसरीतून जुन्या एकनिष्ठ भाजपाईलाच तिकिट मिळणार, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. एवढेच नाही,तर  विधानसभा लढलेले पक्षाच्या एक जुन्या पदाधिकाऱ्याने त्यासाठी गुप्त मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गडकरीवाड्यावरच नव्हे, तर मुंबईसह दिल्लीलाही त्यांच्या चकरा वाढल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com