वॉर्ड पद्धतीने पालिका निवडणूक पिंपरीमध्ये राष्ट्रवादीला फायदेशीर

प्रभागाऐवजी (बहू सदस्यीय) वॉर्ड पद्धतीने (एक सदस्यीय) पालिका निवडणूक घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा पुन्हा पालिकेत सत्तेत येण्यास भाजपपुढे अडसर आला आहे. अजित पवार यांच्या पुढाकारामुळे महाविकास आघाडी सरकारने प्रभाग पद्धत रद्द करून पुन्हा वॉर्ड सिस्टीम आणणारा कायदा गुरुवारी विधानसभेत मंजूर केला आहे.
वॉर्ड पद्धतीने पालिका निवडणूक पिंपरीमध्ये राष्ट्रवादीला फायदेशीर

पिंपरी: प्रभागाऐवजी (बहू सदस्यीय) वॉर्ड पद्धतीने (एक सदस्यीय) पालिका निवडणूक घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे  दुसऱ्यांदा पुन्हा पालिकेत सत्तेत येण्यास भाजपपुढे अडसर आला आहे. अजित पवार यांच्या पुढाकारामुळे महाविकास आघाडी सरकारने प्रभाग पद्धत रद्द करून पुन्हा वॉर्ड सिस्टीम आणणारा कायदा गुरुवारी विधानसभेत मंजूर केला आहे.

वॉर्ड पद्धत अडचणीची असल्याने २०१४ ला सत्तेत येताच युती सरकारने राज्यात महापालिका निवडणुकीत प्रभाव पद्धत आणली. त्याचा फायदा पिंपरी चिंचवडसह राज्यातील अनेक पालिकांत भाजपला झाला. तेथे त्यांची प्रथमच सत्ता आली. पिंपरी चिंचवड पालिकेतही राष्ट्रवादीची १५ वर्षाची सत्ता २०१७ ला गेली.

दरम्यान, राज्यातील भाजपची सत्ता जाऊन राष्ट्रवादी नुकतीच सत्तेत आली.तीन आठवड्यातच त्यांनी भाजपला फायदेशीर ठरलेली प्रभाग पद्धत रद्द केली आणि पुन्हा वॉर्ड सिस्टीम आणली. त्यातून आता राज्यानंतर पिंपरी चिंचवडसह राज्यात हातातून गेलेल्या पालिकांत पुन्हा सत्तेत येण्याची आशा दोन्ही काँग्रेसला वाटू लागली आहे. त्यासाठी त्यांना शिवसेनेचीही रसद मिळणार आहे.

दुसरीकडे वॉर्ड सिस्टीममध्ये एकच नगरसेवक असल्याने विसंवाद राहणार नाही.त्यामुळे विकासकामांना गती मिळेल,असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.सध्या प्रभाग पद्धतीत चार नगरसेवक असल्याने त्यांच्यांत लवकर एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com