Pimpri NCP Targets MLA Laxman Jagtap and Mahesh Ladage over Penalty Tax | Sarkarnama

शास्तीकराच्या प्रश्नावरुन पिंपरीत राष्ट्रवादीकडून भाजप आमदारांवर हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 डिसेंबर 2019

सत्ता गेल्यानंतर एका महिन्याच्या आत लोकांत शासनाप्रती नाराजी व असंतोष असल्याचा साक्षात्कार या आमदारांना कसा झाला,अशी खोचक विचारणा पिंपरी पालिकेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना उद्देशून केली आहे

पिंपरी : मागील पाच वर्षे सत्तेत असणार्‍या भाऊ, दादा या दोन्ही भाजप आमदारांना शहरातील पाणी प्रश्न व शास्तीकराचा प्रश्न सोडवता आला नाही. नागपूरच्या तालावर नाचत कारभार हाकला.सत्ता गेल्यानंतर आता पुन्हा एकदा नागपुरात जाऊन शहरातील प्रश्नासाठी लक्षवेधी मांडण्याची वेळ का आली याचा अभ्यास या आमदारांनी करावा, असा हल्लाबोल राष्ट्रवादीने केला आहे.

शहरातील शास्तीकर व पाणीप्रश्नी आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे १६ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी दिली असल्याची बातमी 'सरकारनामा'ने मंगळवारी दुपारी दिली. त्यानंतर लगेचच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी जगताप व लांडगेंना सायंकाळी लक्ष्य केलं. 

सत्ता गेल्यानंतर एका महिन्याच्या आत लोकांत शासनाप्रती नाराजी व असंतोष असल्याचा साक्षात्कार या आमदारांना कसा झाला,अशी खोचक विचारणा त्यांनी केली. स्वताचे अपयश लपविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत,असा हल्लाबोल काटेंनी केला. शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले असतानाही दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेतील सत्ताधारी भाजपने घेतल्याबद्दल त्यांनी टीका केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख