pimpri-ncp-meeting | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

निवडणुक तयारीनंतर `राष्ट्रवादी'ची आता उमेदवार चाचपणी

उत्तम कुटे
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

निवडणुक तयारीच्या आढावा बैठकांनंतर राष्ट्रवादीने आता उमेदवार चाचपणीलाही सुरवात केली आहे. त्यासाठी येत्या 6 व 7 तारखेला राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत बोलावली आहे. त्यातून लोकसभा निवडणूक ही कदाचित या वर्षअखेरीस होण्याचे संकेत मिळत आहेत.

पिंपरीः निवडणुक तयारीच्या आढावा बैठकांनंतर राष्ट्रवादीने आता उमेदवार चाचपणीलाही सुरवात केली आहे. त्यासाठी येत्या 6 व 7 तारखेला राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत बोलावली आहे. त्यातून लोकसभा निवडणूक ही कदाचित या वर्षअखेरीस होण्याचे संकेत मिळत आहेत.

पुणे शहर,जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहराची आढावा बैठक दोन दिवसांपूर्वीच (ता.1) अजित पवार यांनी घेतली. त्यात बूथ रचनेसह निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर लगेचच शिरूर व मावळची ही दुसरी बैठक होत आहे. त्यात उमेदवारीविषयी चर्चा व चाचपणी होणार असल्याचे या बैठकीचे आमंत्रण असलेल्या एक पदाधिकाऱ्याने `सरकारनामा'ला आज सांगितले. 

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांचे नाव मावळसाठी कालच (ता.2) पुढे आले आहे. त्यामुळे त्यांना ती मिळते की दुसऱ्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे 6 तारखेलाच कळणार आहे.तर, मावळमधून जसे पार्थ यांचे नाव पुढे येऊन मतदारसंघातच नव्हे,तर संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवारांत खळबळ उडाली. तसेच शिरूरमधूनही असे नाव पुढे येते का हे सुद्धा 6 तारखेलाच कळणार आहे. कारण त्याच दिवशी मावळनंतर लगेचच शिरूरची अशी बैठक होणार आहे.

या दोन दिवसांच्या बैठक सत्राची सुरवात पुणे जिल्ह्यापासून होणार आहे. जिल्ह्यातील मावळची बैठक सकाळी पावणेअकरा वाजता आहे. नंतर शिरूर व टप्याटप्याने इतर मतदारसंघाच्या त्या होणार आहेत. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकणार आहेत. आघाडी जवळपास नक्की होणार असल्याने कॉंग्रेस व इतर पक्षांना सोडावयाच्या जागांबाबतही यावेळी खल होणार आहे. त्याची मदत नंतर मित्रपक्षाबरोबर जागावाटपासाठी होणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख