अजित पवार काट्याने काढण्याच्या भीतीने राष्ट्रवादीचे इच्छुक गारठले

राष्ट्रवादीच्या काल रात्री उशीराच्या यादीत पिंपरी-चिंचवडचे उमेदवार जाहीर न झाल्याने शहरातील सस्पेन्स वाढला आहे.येथील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील पक्ष इच्छूकांची धडधड वाढली आहे. कारण निवडणुकीनंतर शहरातील पहिल्याच मेळाव्यात अजित पवार यांनी काट्याने काटा काढणार असल्याचे सांगितलेले आहे.त्यामुळे युतीतील नाराजांना तर दादाउमेदवारी देणार नाहीत,ना या भीतीने पक्षाचे इच्छुक हादरले आहेत. दरम्यान,मावळात भाजपच्या नगरसेवकाला राष्ट्रवादी तिकिट देणार असल्याच्या जोरदार चर्चेने त्यात आणखी भर टाकली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar

पिंपरी : राष्ट्रवादीच्या काल रात्री उशीराच्या यादीत पिंपरी-चिंचवडचे उमेदवार जाहीर न झाल्याने शहरातील सस्पेन्स वाढला आहे.येथील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील पक्ष इच्छूकांची धडधड वाढली आहे. कारण निवडणुकीनंतर शहरातील पहिल्याच मेळाव्यात अजित पवार यांनी काट्याने काटा काढणार असल्याचे सांगितलेले आहे.त्यामुळे युतीतील नाराजांना  तर  दादाउमेदवारी देणार नाहीत,ना या भीतीने पक्षाचे इच्छुक हादरले आहेत. दरम्यान,मावळात भाजपच्या नगरसेवकाला राष्ट्रवादी तिकिट देणार असल्याच्या जोरदार चर्चेने त्यात आणखी भर टाकली आहे.

राष्ट्रवादीने पुण्यात उमेदवारीत यंग ब्रिगेड उभी केली आहे. त्यातून नव्या व फ्रेश चेहऱ्यांना संधी दिली जाईल,असे शरद पवार यांनी केलेले वक्तव्य खरे ठरले आहे. त्यामुळे तोच पॅटर्न पिंपरी-चिंचवडमध्ये राबविला जातो की काय या भीतीने येथे  जुन्याजाणत्या नेत्यांचे ब्लडप्रेशर वाढले आहे. कालच्या राष्ट्रवादीच्या ७७ जणांच्या  लिस्टमध्ये पुणे शहरातील चार आणि जिल्ह्यातील सहा असे दहाजण आहेत. युतीत व त्यातही भाजपमध्ये बंडखोरी अपेक्षित असलेला पुणे जिल्हाच नव्हे,तर राज्यातील इतर मतदारसंघातीलही उमेदवार पक्षाने जाहीर केलेले नाहीत. मावळ आणि पिंपरी ही त्याची उदाहरणे आहेत. त्यातून काट्याने काटा काढणार हे अजित पवारांनी रिपीट केलेले विधान खरे ठरण्याची शक्यता वाढली आहे. मात्र,तसं नुसतं होण्याच्या भीतीने ऑक्टोबर हिटचा तडाखा बसणाऱ्या या दिवसांतही राष्ट्रवादीचे शहरातील इच्छुक पार गारठले आहेत.

शिवसेना उमेदवाराविषयी नाराजी असलेल्या पिंपरीसह पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे तिकिटही राष्ट्रवादीने काल जाहीर केलेले नाहीत. पिंपरीत,तर शिवसेनेच्या जोडीने भाजपमधूनही बंडाचे झेंडे फडकले आहेत. तेथे आज शिवसेनेबरोबर भाजपचेही बंडखोर उमेदवारी दाखल करीत आहेत. तर, पिंपरीतूनच आपणही शंभर टक्के अर्ज भरणार असल्याचे शिवसेनेच्याच एका नगरसेवकाने काल जाहीर केले आहे. पिंपरीच्या तुलनेत उद्योगनगरीतील भोसरी व चिंचवड या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीला विरोध झालेला नाही. त्यामुळे तेथे तोडीस तोड उमेदवार राष्ट्रवादी देईल, असा अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com