शेळी झालेल्या शिवसेनेने जोडे हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नये : पिंपरी भाजपचा इशारा

मुख्यमंत्री असलेले शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वादात आता भाजपची महिला आघाडी आणि पिंपरी-चिंचवडच्या महिला महापौरांनी बुधवारी उडी घेतली.
Pimpri BJP Enters Amruta Fadanavis Uddhav Thackeray Row
Pimpri BJP Enters Amruta Fadanavis Uddhav Thackeray Row

पिंपरी : मुख्यमंत्री असलेले शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वादात आता भाजपची महिला आघाडी आणि पिंपरी-चिंचवडच्या महिला महापौरांनी बुधवारी उडी घेतली.

सत्तेसाठी काँग्रेससमोर शेळी बनलेल्या शिवसेनेने एका महिलेचा निषेध करून वाघ असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आम्ही कदापी खपवून घेणार नाही.आमच्या पायातही जोडे आहेत हे त्यांनी ध्यानात ठेवावे. जशास तसे उत्तर देण्याची आमच्यातही हिंमत असून, पायातील जोडे हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नये, असा पलटवार पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे आणि पक्षाच्या महिला शहराध्यक्षा शैला मोळक यांनी करीत शिवसेना व ठाकरे यांना अमृता फडणवीस यांच्याप्रमाणे पुन्हा डिवचले.

जोडे मारो निषेध आंदोलनामागे शिवसेनेच्या काही जणांचा आपली राजकीय दुकानदारी सुरू करण्याचा प्रयत्न आहे,असा आऱोपही भाजपच्या या दोन महिला पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ठाकरे नाव असले, म्हणजे कुणी ठाकरे होत नाही, अशी बोचरी टीका सौ. फडणवीस यांनी ट्विटरवर केली होती. त्याला उत्तर म्हणून शिवसेना महिला आघाडीने पिंपरी-चिंचवडमध्ये अमृता यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केले होते. त्याला अमृता यांनी पुन्हा ट्विटरवरच जोरदार प्रत्युत्तर मंगळवारी दिले. जोडे मारो चा व्हिडिओ शेअर करीत त्यांनी दगडफेक आणि चप्पल दाखवणे हा तुमचा जुना छंद आहे, असे या व्हिडीओखाली म्हणत पुन्हा शिवसेनेला टोला लगावला. ही लीडरशीप नसून हल्ला असल्याचे ट्विट त्यांनी केले होते. 

या वादात आज पिंपरीच्या नेमस्त स्वभावाच्या महापौर आणि महिला शहराध्यक्षांनी उडी घेतली. ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या महिलांचा मान राखणे हे शिवसेनेच्या संस्कृतीत बसत नसल्याचेच महिला शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे, असा हल्लाबोल या दोघींनी केला.राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर शिवसेनेने त्यांचा निषेध करायला हवा होता. परंतु, सत्तेच्या लोभापायी ती गप्प बसली.आता,मात्र अमृता फडणवीस यांच्या निषेधासाठी तिने आंदोलन केले. त्यांची ही कृती निंदनीय आहे,असे या त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महापौर आणि मोळक म्हणतात,...''हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे तमाम मराठी माणसांसाठी वंदनीय आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी केलेले कार्य राज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळेच बाळासाहेब  यांच्यासारखा दुसरा ठाकरे होणे नाही हेच अमृता यांना महाराष्ट्राला सांगायचे आहे.परंतु, त्यांचे हे वक्तव्य शिवसेनेला चांगलेच झोंबल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमधील महिला शिवसैनिकांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याच्या निषेधासाठी केलेल्या आंदोलनाचे कोणीही समर्थन करू शकत नाही. एका महिलेबाबत आपण कोणत्या थराला जाऊन वागत आहोत, याचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही. महिलांनीच महिलांचा मान राखयला हवा. परंतु, महिलांचा मान राखण्याची शिवसेनेची संस्कृती नसल्याचे पिंपरी-चिंचवडमधील महिला शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या  आंदोलनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com