पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाची निवडणूक; आमदार भाऊ आणि अण्णांच्या प्रतिष्ठेची

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर या दोन पदाच्या उमेदवार निवडीत पालिकेतील सत्ताधारी भाजप व विरोधी राष्ट्रवादी अशा दोन पक्षांच्या दोन आमदारांचाच वरचष्मा सोमवारी राहिला. त्यांचीच प्रतिष्ठा २२ तारखेला होणाऱ्या या निवडणुकीत पणास लागली आहे.
Laxman Jagtap - Anna Jatap
Laxman Jagtap - Anna Jatap

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर या दोन पदाच्या उमेदवार निवडीत पालिकेतील सत्ताधारी भाजप व विरोधी राष्ट्रवादी अशा दोन पक्षांच्या दोन आमदारांचाच वरचष्मा सोमवारी राहिला. त्यांचीच प्रतिष्ठा २२ तारखेला होणाऱ्या या निवडणुकीत पणास लागली आहे. राष्ट्रवादीचे उपमहापौरपदाचे उमेदवार राजू बनसोडे हे शहरातील पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पिंपरी मतदारसंघातील आहेत. महापौरपदाचे राष्ट्रवादीच्या उमेदवार माई काटे या ही पिंपरीतीलच आहेत. एवढेच नाही,तर हे दोघे एकाच प्रभागातील आहेत.

दोन्ही पदांचे राष्ट्रवादीचे उमेदवार ठरविताना बनसोडे यांचीच छाप असल्याचे दिसून आले आहे. शहरात चिंचवड व भोसरी या इतर दोन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. त्यापैकी चिंचवडचे आमदार व शहराचे कारभारी लक्ष्मणभाऊ जगताप यांचा या दोन पदांचे पक्षाचे उमेदवार निश्चीत करताना वरचष्मा राहिला आहे.महापौरपदाचे भाजपचे उमेदवार माई ढोरे या त्यांच्या समर्थक आहेत. तर, उपमहापौरपदासाठीही त्यांनी ऐनवेळी आपले समर्थक तुषार हिंगे यांनाच संधी दिली आहे.

यामुळे पदाची अदलाबदल करण्याच्या निर्णय़ानुसार आता पालिकेच्या खजिन्याची चावी असलेले स्थायी समितीचे अध्यक्षपद हे भोसरीचे आमदार व शहराचे दुसरे कारभारी महेशदादा लांडगे यांच्या समर्थकाकडे जाणार असल्याचे महापौर निवडीतून संकेत मिळाले आहेत. कारण सध्या महेशदादांच्या पाठीराख्याकडे असलेले महापौरपद भाऊंच्या समर्थकाकडे देण्यात आले आहे.

२०१४ ला शहरातील तिन्ही आमदार युतीचेच (दोन भाजप,एक शिवसेना) होते. हे समीकरण २०१९ला थोडे बदलले. एक आमदार (पिंपरीत बनसोडे) राष्ट्रवादीचे झाले. भोसरी व चिंचवडच्या जागा भाजपने कायम राखल्या.त्यामुळे राष्ट्रवादीचे महापौर,उपमहापौरपदाचे उमेदवार निवडीत बनसोडेंचा वरचष्मा राहणे स्वाभाविक होते.त्यांच्याच मतदारसंघातून शहरातील पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक २०१७ ला निवडून आलेले आहेत.

त्याचाच फायदा २०१९ ला विधानसभेला त्यांना  झाला. त्यामुळे या दोन पदांच्या निवडणुकीत ते आपले अस्तित्व जाणवून ते अधिक गडद करण्याचा प्रयत्न करणार,यात शंका नाही. त्यातून ही निवडणूक बनसोडेंच्या दृष्टीने काहीशी प्रतिष्ठेची झाली आहे. तर, गतवेळपेक्षा यावेळी निम्याने मताधिक्य विधानसभेला घटलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांना महापौर, उपमहापौर निवडीत ते वाढवून आपला दबदबा कायम असल्याचे दाखवून द्यायचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com