शास्तीमाफी ही फसवणूक आणि गाजर; भाजपच्या श्रेयावर राष्ट्रवादीचा पलटवार

शास्तीमाफी ही फसवणूक आणि गाजर; भाजपच्या श्रेयावर राष्ट्रवादीचा पलटवार

शास्तीकरमाफी ही पूर्वलक्ष्यी प्रभावाने आणि सरसकट नसल्याने त्यात आपल्यामुळे सवलत मिळाल्याचा भाजपने केलेला दावा म्हणजे फसवणूक आणि आणखी एक गाजर असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसने शनिवारी केला.

पिंपरी : शास्तीकरमाफी ही पूर्वलक्ष्यी प्रभावाने आणि सरसकट नसल्याने त्यात आपल्यामुळे सवलत मिळाल्याचा भाजपने केलेला दावा म्हणजे फसवणूक आणि आणखी एक गाजर असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसने शनिवारी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण दिलेल्या पत्रामुळे शास्तीमाफीची मर्यादा एक हजार चौरस फूट करण्यात आली, असा दावा पिंपरी-चिंचवड भाजप अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. ही परिषद झालेल्या ठिकाणीच काही मिनिटातच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप आणि पालिकेतील पक्षाचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या दाव्याची आणि श्रेयबाजीची चिरफाड केली. 

जनमताचा रेटा आणि सर्वपक्षीयांच्या दबावामुळे हा निर्णय झाला असल्याने त्याबद्दल भाजप घेत असलेल्या श्रेयाचा त्यांनी   केला. निवडणूक आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने ही करसवलतसुद्धा मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सरसकट पूर्वलक्ष्यी प्रभावाने ती देण्याची आपली मागणी कायम असल्याचे ते म्हणाले. 

अनधिकृत बांधकामाचा मूळ प्रश्न सुटला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता माफी दिलेल्या रहिवाशांकडून आतापर्यंत वसूल केलेले कोट्यवधी रुपये चक्रवाढ व्याजासह पालिकेने परत देण्याची मागणी त्यांनी केली. गेली साडेचार वर्षे याप्रश्नी झोपलेल्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय का घेतला अशी विचारणाही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com