पिंपरीमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्यात राष्ट्रवादी नगरसेवकासह शिवसेना आमदारांचे जावई अटकेत

पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी फक्त पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातच मतदानाच्या दिवशी दहशत निर्माण होण्याची शक्यता असल्याने गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याची शिवसेना,भाजपच्या खासदारांनी केलेली मागणी व व्यक्त केलेली भीती खरी ठरली. शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यात काल मोठा राडा झाला. त्यात दोघे गंभीर जखमी झाले असून एकजण कोमात आहे.
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal Corporation

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी फक्त पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातच मतदानाच्या दिवशी दहशत निर्माण होण्याची शक्यता असल्याने गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याची शिवसेना,भाजपच्या खासदारांनी केलेली मागणी व व्यक्त केलेली भीती खरी ठरली. शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यात काल मोठा राडा झाला. त्यात दोघे गंभीर जखमी झाले असून  एकजण कोमात आहे. 

दरम्यान, याप्रकरणी खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे परस्परांविरुद्ध (क्रॉस कंप्लेट) दाखल  झाले आहेत. त्यात पिंपरीचे शिवसेना आमदार अॅड गौतम चाबूकस्वार यांचे जावई बबलू सोनकर आणि राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यासह चौघांना पिंपरी पोलिसांनी आज अटक केली. त्यांच्याकडून रिव्हॉल्वर, पिस्तूल व  ११ राउंड व एक मोटार असा पावणेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे दिसून येत आहे. खुद्द खासदारांनीच भीती वर्तवूनही पोलिसांनी तशी  प्रतिबंधक उपाययोजना न केल्याने हा प्रकार झाला.या दोन गटात पूर्ववैमनस्य होते व आहे.त्यावरून त्यांच्यात निवडणुकीत राडा होण्याची दाट शक्यता होती. कारण आसवानी यांनी चाबूकस्वारांविरुद्ध निवडणुकीअगोदरही एनसी दाखल केली होती.त्यामुळेच पिंपरीतील संवेदनशील भागात आणि गुन्हेगारांवर करडी नजर ठेवा,अशी लेखी मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे आणि भाजपचे राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली होती. 

शहरात मोठा वावर असलेल्या गुन्हेगारांवर करडी नजर ठेवावी. मतदारांवर दहशत होता कामा नये, अशा सूचना त्यांनी पोलीस आयुक्तांना या भेटीत केल्या. त्यांची ही भीती तंतोतंत खरी ठरली.मतदानाच्या दिवशी शहरात भोसरी,चिंचवड नाही,तर फक्त पिंपरीतच मोठा राडा झाला. याप्रकरणी आसवानींच्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरात घुसून सोनकरने डोक्याला पिस्तूल लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर, सोनकरच्या गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार आसवानींच्या भाडोत्री गुंडांनीच आपल्यावर जीवघेणा हल्ला केला.आता येत्या गुरुवारी (ता.२४)मतमोजणीला या दोन्ही गटांवर व एकूणच पिंपरीत पोलिसांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची पाळी आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com