pimpri-dogs-in-PCMC | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड महापालिका की पशुपक्षीसंग्रहालय; डुक्कर, कुत्र्याची पिल्ले व आता शिकारी कुत्री महापालिकेत

उत्तम कुटे 
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

परवा (ता.27)होणाऱ्या पिंपरी पालिका सभेत भटक्या कुत्र्यांचा प्रश्नावरून पुन्हा राडा होण्याचे संकेत आज मिळाले. या प्रश्नावरून या सभेत पुन्हा पिल्ले नव्हे,तर मोठे दोन कुत्रेच आता विरोधक आणणार आहेत. लायसन्स काढून पालिकेत ही बंटी आणि बबलीची जोडी आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज सांगितले.

पिंपरीः परवा (ता.27)होणाऱ्या पिंपरी पालिका सभेत भटक्या कुत्र्यांचा प्रश्नावरून पुन्हा राडा होण्याचे संकेत आज मिळाले. या प्रश्नावरून या सभेत पुन्हा पिल्ले नव्हे,तर मोठे दोन कुत्रेच आता विरोधक आणणार आहेत. लायसन्स काढून पालिकेत ही बंटी आणि बबलीची जोडी आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज सांगितले.

या महिन्याच्या 19 तारखेला झालेल्या पालिका सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून पालिकेत मोठा राडा झाला होता. साने यांनी कुत्र्याची पिल्लेच सभागृहात आणल्याने मोठा गोंधळ झाला. नंतर ही सभा 27 तारखेपर्यंत तहकूब झाली होती. त्यावेळी कु्त्र्यांच्या पिल्लांना बॅगेत आणून त्यांच्यावर अत्याचार केला म्हणून साने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी केली होती. दुसरीकडे हा प्रश्न जैसे थे च आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा पालिकेत कुत्री नेण्यावर साने ठाम आहेत. फक्त यावेळी मोठी कुत्री परवानगी घेऊन ते नेणार आहेत. त्यांना बंटी आणि बबली अशी नावे देणार असल्याचे साने यांनी सांगितले.

कुत्र्यांबरोबर शहरात डुक्कर आणि मोकाट गाईंचाही मोठा उपद्रव आहे. त्यातूनच पालिका सभागृहात कुत्र्याची पिल्ले आणण्यापूर्वी काही दिवस अगोदर विरोधी बाकावरील शिवसेना नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी डुक्करच पालिका आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये सोडले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा कुत्री पालिकेत सोडण्यात येणार असल्याने ही पालिका आहे की पशु संग्रहालय अशी उपरोधीक चर्चा आज पालिका वर्तूळात रंगली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख