पिंपरीला एका तपानंतर तरी मंत्रिपद मिळणार का ?

अनेकदा होऊ घातलेला राज्य मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने ती आता अफवाच ठरू पाहत आहे. त्यामुळे त्यात संधी मिळेल, ही आशा पिंपरी-चिंचवडकरांनी आता सोडूनच दिली आहे. मात्र, शेवटचे दोन महिने,तरी शहराला मंत्रीपद मिळून एका तपाचा बॅकलॉग भरून निघेल,अशी आशा शहराचे कारभारी व भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगतापांच्या समर्थकांना अजूनही वाटते आहे.
पिंपरीला एका तपानंतर तरी मंत्रिपद मिळणार का ?

पिंपरीः अनेकदा होऊ घातलेला राज्य मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने ती आता अफवाच ठरू पाहत आहे. त्यामुळे त्यात संधी मिळेल, ही आशा पिंपरी-चिंचवडकरांनी आता सोडूनच दिली आहे. मात्र, शेवटचे दोन महिने,तरी शहराला मंत्रीपद मिळून एका तपाचा बॅकलॉग भरून निघेल,अशी आशा शहराचे कारभारी व भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगतापांच्या समर्थकांना अजूनही वाटते आहे. 

पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्ताराचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे उद्योगनगरीत प्रथमच भाजपची सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा असलेले भाऊ यांच्या समर्थकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, आता नवरात्रानंतरच्या नव्या मूहूर्तावर, जरी मंत्रीमंडळ विस्तार झाला, तरी फडणवीस यांच्या धक्कातंत्रामुळे ही संधी शहराला मिळेल की नाही,याविषयी भाजपचेच पदाधिकारी साशंक आहेत. कारण यापूर्वी अनेकदा मंत्रीपदाने शहराला हुलकावणी दिलेली आहे. तर,या किरकोळ बदलासाठी राज्यातील भाजपचे अनेक हेवीवेट आमदार प्रबळ दावेदार आहेत. 

या विस्तारानंतर लोकसभेची निवडणूक आहे. त्यासाठी बेरजेचे राजकारण या विस्तारातून केले जाणार आहे. प्रादेशिक व जातीय समतोल साधण्याच्या या राजकारणात पिंपरीला किती वाव मिळेल,याविषयी राजकीय जाणकारही साशंक आहेत.कारण पिंपरीचा समावेश असलेल्या पुणे जिल्ह्याला अगोदरच एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री देण्यात आलेले आहे. मात्र, युती न होण्याची शक्यता गृहित धरून येथील दोन लोकसभेच्या जागा खेचून आणण्यासाठी शहराला बळ देण्याचे ठरले, तर ही संधी अनुभवी व आमदारकीची हॅटट्रिक केलेल्या भाऊंना मिळण्याची दाट शक्यता आहे. 

राज्यमंत्री,जर मिळाले,तर ते मुख्यमंत्र्यांच्या गुडबुकातील भाजपचे सहयोगी सदस्य आणि भोसरीचे अपक्ष आमदार महेशदादांना मिळू शकते, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. दुसरीकडे मंत्रीपद कुणालाही द्या,पण ते पिंपरीला मिळू द्या, अशी शहरवासियांची भावना नव्हे,तर रास्त मागणीच आहे. ती पूर्ण होते का हे दसऱ्याला कळेल. वा त्यासाठी पुन्हा दिवाळीचा मुहूर्त काढला जातो की काय हे सुद्धा समजले.जर ही संधी दसऱ्याला मिळाली,तर मंत्रीपदाचे तोरण भोसरी कि चिंचवडला (भाऊंचा मतदारसंघ) लागते हे स्पष्ट होईल. 

दिवाळीत मंत्रीमंडळ विस्तार होऊन त्यात उद्योगनगरीचा समावेश झाला,तर चिंचवडमध्ये फटाके फुटतात की भोसरीत हे ही समजणार आहे. मात्र, मंत्रीपदाचे तोरण शहराला लागले नाही,वा त्याचे फटाकेही फुटले नाहीत,तर पिंपरी-चिंचवडकरांची अवस्था तेलही गेले,तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले,अशीच होणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com