पिंपरी-चिंचवडला आघाडीत २००९ चा जागावाटप फॉर्म्यूला

 पिंपरी-चिंचवडला आघाडीत २००९ चा जागावाटप फॉर्म्यूला

पिंपरीः युती व आघाडी व त्यातही आघाडी ही जवळपास नक्की झाली असली,तर जागावाटपाचा पेच चिंचदोन्ही कॉंग्रेसला पिंपरी-चिंचवड,पुणे,जिल्ह्यासह राज्यातही सतावतो आहे.२८८ पैकी २२० जागांवर सहमती झाली असून ६८ ठिकाणी ती व्हायची आहे.

पिंपरी-चिंचवडमधील तीन जागांचा त्यात समावेश आहे. यावेळी तेथे २००९ चा फॉर्म्यूला कायम ठेवण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.त्यानुसार दोन जागा राष्ट्रवादी व एक कॉंग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.मावळच्या जागेवर एकमत झाले असून ती राष्ट्रवादीकडे कायम राहणार आहे.

दहा वर्षानंतर आघाडीच नाही,तर युतीही विधानसभेला होऊ घातली आहे. दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. त्यामुळे २००९ ला असलेल्या युती व आघाडीच्या जागावाटपात यावेळी थोडा बदल होणार आहे. काही जागा अदलाबदल होण्याचा संभव आहे. काही ठिकाणी दुबळा असलेला पक्ष दहा वर्षात तेथे मजबूत झाला आहे. 
त्यामुळे तेथे तो क्लेम करण्याची शक्यता आहे. त्यानुसार पिंपरी राखीव या २००९ मध्ये राष्ट्रवादीने लढविलेल्या व विजयी झालेल्या मतदारसंघावर यावेळी कॉंग्रेसने दावा ठोकला आहे. कारण शहरातील तीनपैकी याच एकमेव ठिकाणावरून निवडून येऊ असा विश्वास त्यांना वाटतो आहे. दरम्यान, २०१४ ला शिवसेनेने जिंकलेला हा गड पुन्हा मिळू शकतो,असा आत्मविश्वास राष्ट्रवादीलाही वाटतो आहे.

त्यामुळे शहरात राष्ट्रवादीलाही हाच मतदारसंघ सेफ वाटतो आहे. त्यामुळे ते पिंपरीसह भोसरी हा २००९ला आमदार असलेला मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवणार आहे. तर, त्यावेळी कॉंग्रेसकडे असलेला चिंचवड ते यावेळीही त्यांच्याकडेच देतील,अशी शक्यता आहे.
 
एकीकडे आघाडी जवळपास निश्चीत झाली असताना दुसरीकडे युती निश्चीत होणार असेच फक्त बोलले जात आहे.त्यांची जागावाटपाची चर्चा सुरु न झाल्याने युती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही शहरात गॅसवर आहेत. त्यामुळे ऐनवेळेस युती गेल्यावेळसारखी फिस्कटली,तर शिवसेनेबरोबर भाजपनेही स्वबळाची तयारी केली आहे. 

तिन्ही मतदारसंघात इच्छूकांचे अर्ज दोन्ही पक्षांनी मागवले आहेत. युती झाली,तर आघाडीप्रमाणेच युतीतही भाजप दोन व शिवसेना एक असे जागावाटप होईल असा अदाज आहे.जर,आरपीआयने आग्रह कायमच ठेवला,तर प्रत्येकी एकेक असाही शेवटच्या क्षणी होऊ शकतो.

दोन्ही कॉंग्रेसच्या नुकत्याच पुण्यात झालेल्या बैठकीत वाद नसलेल्या व २०१४ ची विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांनुसार २४० मतदारसंघात एकमत झाले आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील (पुणे आणि पिंपरी चिंचवडसह) १२ मतदारसंघ आहेत.

त्यातील ८ राष्ट्रवादी,तर चार कॉंग्रेसकडे राहणार आहेत.मात्र,पिंपरी-चिंचवड,पुणे शहर आणि जिल्हयातील ९ जागांवर एकमत झालेले नाही. तेथे अदलाबदल होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील कसबा व शिवाजीनगर,तर जिल्ह्यातील भोर आणि पुरंदर या जागा कॉंग्रेसला देण्याचे ठरले आहे.तर, पुण्यातील खडकवासला व जिल्हयातील आंबेगाव,शिरूर,खेड-आळंदी,मावळ,दौंड,इंदापूर,बारामती या ठिकाणी राष्ट्रवादी लढणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com