पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर निविदा रिगमध्ये?

पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर निविदा रिगमध्ये?

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोट्यावधी रुपयांच्या निविदांच्या रिगमध्ये पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा सहभाग असल्याचा सनसनाटी आरोप पालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी मंगळवारी केला. 

आयुक्तांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी कामठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्याकडे केली आहे. हा भाजपला घरचा आहेर समजला जात आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी हर्डीकरांना नागपूरहून पिंपरीत आणलेले आहे.

निविदांत रिग होत असल्याचा आरोप विरोधी बाकावरील राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही केलेला आहे. सत्ताधार्यांच्या हातचे बाहूले,घरगडी अशी आयुक्तांची त्यांनी संभावनाही केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांच्याही या वाढत्या विरोधामुळे आयुक्तांच्या बदलीची चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र, ते मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आहेत.त्यांना नागपूरहून पिंपरीत मुख्यमंत्र्यांनीच आणलेले आहे.

निविदा रिगमध्ये पालिका अधिकारी सामील असून त्याचे पुरावे देऊन कारवाई न झाल्याने कामठे यांनी नाराजी व्यक्त केली आहे यासंदर्भात आयुक्तांना चार पत्र दिली.मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

ही रिग कशी केली जाते याबाबत ते म्हणाले," पालिकेत  पाच,सहा ठेकेदार रिग करीत आहेत.त्यांनाच आलटून पालटून कामे मिळावीत म्हणून पालिकेच्या स्थापत्य व भांडार विभागाचे अधिकारी जाचक अटी निविदेत टाकतात. त्यामुळे त्यांना प्रतिसाद कमी मिळून ठराविक पाच,सहा ठेकेदारांना त्यात रिग करण्याची संधी मिळते. 

त्याचा फायदा या अधिकार्यांना होतो", या रिगमुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. करदात्यांंचे पैसे वाचविण्यापेक्षा ठेकेदारांना कसा लाभ होईल हे आयुक्त पाहत असल्याने आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या आयुक्तांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी,असे कामठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे कारण देऊन आयुक्तांची बदली होते की कसे हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com