Chinchwad election : चिंचवडचे मतदार कुणाचे ऐकणार ? भावाचे की बहिणीचे ?

BJP vs NCP : पंकजा मुंडे यांच्यानंतर आज धनंजय मुंडेंची तोफ धडाडणार
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama

By Poll Election : चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकस आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेनेत (ठाकरे) बंडखोरी करून अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात लढत होत आहे. सध्या तिन्ही उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजपने त्यांच्या उमेदवारांसाठी ४० तर महाविकास अघाडीकडून २० स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. येथे काल भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे येणार आहेत. त्यामुळे चिंचवडकर या निवडणुकीत बहीण पंकजा की भाऊ धनंजय यांचे ऐकणार, हे येणाऱ्या काळता समजणार आहे.

चिंचवडमध्ये (Chinchwad) काल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची सभा तुफान गाजली. अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांनी रहाटणीतील सभेत चांगलीच बॅटिंग केली. त्यांच्या विविध वक्तव्यांनी उपस्थितांना हसू आनावर झाले.

आक्रमकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पंकजा यांच्या कालच्या भाषणात मिश्कीलपणा होता. त्या म्हणाल्या, "मते मागायला येणारे आम्ही वधूपक्षाचे लोक असतो. वर काळा असेना त्याला गोरी बायको हवी असते. जाड असूनही त्याला सडपातळ नवरी पाहिजे असते." त्यांच्या या उपरोधात्मक वक्तव्यांवर उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

Dhananjay Munde
Kasba By Election : कसबा मतदारसंघात तब्बल 15 हजार मतदारांचे मतदार यादीत फोटोच नाहीत

पंकजा मुंडे यांनी त्यांचे वडील भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचीही आठवण काढली. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी अचानक खांद्यावर पडली, असे त्या म्हणाल्या. तशीच काहीशी अवस्था अश्विनी जगताप यांची झाली आहे. यानंतर सभेचे वातावरण भावनिक झाले होते.

अश्विनीताईंच्या प्रचाराला बोलावलेत, तसेच विजयानंतर विसरू नका, असेही मिश्किल वक्तव्य करून वातावरण हलकेफुलकेही केले. यानंतर भाजपचा विजय पक्का असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांच्या या भाषणाला चिंचवडकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

Dhananjay Munde
Brahmin Community : कसब्यात ब्राह्मण समाजाचा मेळावा; ठिकाणे दोन, वेळ एकच, नेमकं जायचं कुठे ?

पंकजा मुंडे यांच्या या तुफान भाषणानंतर आज त्यांचे बंधु धनंजय मुंडे (Dhananjay Munde) चिंचवडमध्ये येणार आहेत. ते राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचार करणार आहेत. काल ज्या ठिकाणी बहीण पंकजा मुंडे यांनी भाजपच्या उमेदवारासाठी सभा गाजवली, त्या राहटणीतच धनंजय मुंडे बोलणार आहेत. धनंजय मुंडे हे त्यांच्या आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचा हजरजबाबीपणा आणि शाब्दिक कोट्या प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

Dhananjay Munde
Satara : सुडबुद्धीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांचा पोलखोल करणार : शशिकांत शिंदे संतापले

दरम्यान धनंजय मुंडे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सुमारे महिन्याभराचा कालवधी लागला. त्यानतंर त्यांनी गेल्या आठवड्यात परळी येथे एका सभेला मार्गदर्शन केले.

आता ते चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज राहटणीत येणार आहे. बहीण पंकजा यांच्या फटकेबाजीनंतर राष्ट्रवादीची तोफ असलेले धनजंय यांच्या काय बोलणार? त्यांची सभा गाजणार का? त्यास कसा प्रतिसाद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com