Sharad Pawar Resign : पवारांनी निर्णय बदलला नाही तर पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा

Pimpri Chinchwad : "साहेब तुम्हीच आमचे दैवत, पायउतार होण्याचा निर्णय मागे घ्यावा"
Kavita Alhat, Ajit Gavhane, Imran Shaikh
Kavita Alhat, Ajit Gavhane, Imran ShaikhSarkarnama

Sharad Pawar and NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदावरून पायउतार होण्याची घोषणा मंगळवारी (ता. २) मुंबईत केली. त्यानंतर काही क्षणातच त्याचे पडसाद राज्यभर उमटले. पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करीत आहेत. दरम्यान, शरद पवारांनी राज्यातील पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याने राजीनामा देऊ नये, असे आवाहन केल आहे. मात्र पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देणार असल्याचा इशाराच दिला आहे.

Kavita Alhat, Ajit Gavhane, Imran Shaikh
Sharad Pawar Resigns : शरद पवार विचार करूनच निर्णय घेतात; तारिक अन्वरांनी सांगितला अनुभव

पवारांनी अचानक दिलेल्या या धक्क्याचे पडसाद पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) या त्यांच्या प्रिय शहरात लगेच उमटले आहेत. पूर्वी हे शहर पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात होते. त्यांनीच या शहराजवळ हिंजवडीत आयटी पार्क उभारून या शहराच्या विकासास मोठा हातभार लावलेला आहे. त्यांच्या `लोक माझे सांगाती` या आत्मकथनाच्या भाग दोनच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी ही मुंबईत घोषणा केली. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे पदाधिकाऱ्यांसह गेले होते. ते आता सामूहिक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात असल्याची माहिती दिली.

Kavita Alhat, Ajit Gavhane, Imran Shaikh
Satara News : पवारांचा निर्णय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी; भूमिका बदलावी... बाळासाहेब पाटील
Pimpri-Chinchwad NCP
Pimpri-Chinchwad NCPSarkarnama

शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशिवाय राजकारण आणि राजकारणाशिवाय पवारसाहेब याची कल्पना करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही, तर शहर अध्यक्षांसह पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी मुंबईहून `सरकारनामा`ला सांगितले.

इम्रान शेख म्हणाले, "त्यांच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर या विचारधारेमुळे आम्ही राजकारणात आलो. आता देव्हाऱ्यात देवच नसेल तर त्याची पूजा करून काय फायदा! सध्याची परिस्थिती पाहता देशातील अल्पसंख्याक समाज पवारसाहेब यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. ती त्यांची शेवटची आशा आहे."

Kavita Alhat, Ajit Gavhane, Imran Shaikh
Sharad Pawar Resigns As NCP Chief : पुणे शहराध्यक्षसह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पवारांनी निर्णय मागे घेण्याची मागणी !

साहेब तुम्हीच आमचे दैवत, निर्णय मागे घ्या

राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी साहेब, तुम्ही आमचे दैवत असल्याने पदावरून पायउतार घेण्याचा निर्णय तातडीने मागे घ्या, अशी विनवणी आपल्या सर्वोच्च नेत्याला केली.

कविता आल्हाट म्हणाल्या की, "राजकारणात तब्बल ६३ वर्षे काम करणारे समाजकारणाचे चालते-फिरते विद्यापीठ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आमचे राजकीय क्षेत्रातील काम होऊच शकत नाही. पवारसाहेबांनी महिला आरक्षणासाठी काही तरतुदी करून ठेवल्या त्यामुळे आज अनेक महिला भक्कमपणे राजकारणात काम करत आहेत. साहेबांनी घेतलेला निर्णय कदाचित त्यांच्या दृष्टीने योग्य असेलही, मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून हा निर्णय कोणालाही मान्य नाही. त्यामुळे पवारसाहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा. पुढील काळात त्यांची भक्कम साथ राजकीय दृष्टीने सर्वांनाच हवी आहे. त्यांच्याशिवाय पुढील मार्गक्रमण करणे अतिशय खडतर असल्याचे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते आहे."

शहरातील पक्ष कार्यकर्त्यांनीही या निर्णयाला घोषणेला कडाडून विरोध केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com