मंदिरे उघडली अन्‌ मनसे सैनिकांनी भंडारा उधळीत केली महाआरती...

मंदिरांत भक्तांऐवजी राजकीय नेत्यांचीच गर्दी झाली आहे
मंदिरे उघडली अन्‌ मनसे सैनिकांनी भंडारा उधळीत केली महाआरती...
Manse Mahaartisarkarnama

पिंपरीः दीड वर्षे बंद असलेली राज्यातील मंदिरे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी उघडली आणि तेथे भक्तांऐवजी राजकीय नेते व कार्यकर्त्यांनीच मोठी गर्दी झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत महालक्ष्मी तथा मुंबादेवीचे सपत्नीक दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईतच प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.पिंपरी चिंचवडमध्ये महापौर माई ऊर्फ उषा ढोरे चिंचवड येथील मोरया मंदिरात आरती केली. तर, आपल्या आंदोलनांमुळे सरकारला मंदिरे खुली करणे भाग पडल्याचा दावा `मनसे`ने केला. त्या प्रित्यर्थ त्यांनी आकुर्डीतील खंडोबा मंदिरात भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण आणि येळकोट म्हणत महाआऱती केली.

राज्य शासनाने सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी दिली असली, तरी कोरोनाविषयक नियमांचे तसेच सुचनांचे पालन करा, असे आवाहन ढोरे यांनी आऱतीनंतर केले. सर्व धार्मिक स्थळे खुली झाल्याने आनंदमय वातावरण तयार झाले आहे. परंतू, कोरोना वाढणार नाही,याची खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. दर्शन घेताना सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटाय़झरचा वापर करा, वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

Manse Mahaarti
संजय राऊत म्हणाले, दसरा मेळाव्यावर मुख्यमंत्री घेणार लवकरच निर्णय

धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरामध्ये आरती केली. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक गजानन चिंचवडे, राजु दुर्गे, उर्मिला काळभोर आदी उपस्थित होते. तर, मनसेच्या रेट्यामुळे मंदिरे खुली झाल्याचा दावा करीत मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील खंडोबा मंदिरात महाआरती करण्यात आली.

Manse Mahaarti
पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा, कोरोना रुग्णसंख्येत होतेय घट

यावेळी मनसेचे शहर सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थीसेना अध्यक्ष हेमंत डांगे तसेच उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, चंद्रकांत (बाळा) दानवले,चिंचवड विभागअध्यक्ष मयूरभाऊ चिंचवडे,पिंपरी विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, वाहतूक सेना शहर अध्यक्ष सुशांत साळवी, के के कांबळे आदी पदाधिकारी व मनसैनिकांनी भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण करीत येळकोट केला

Related Stories

No stories found.