Devendra Fadnavis, Mahesh Landge
Devendra Fadnavis, Mahesh LandgeSarkarnama

Mahesh Landge : समर्थकांनाच 'या कारणासाठी' नको आहेत महेश लांडगे पुन्हा शहराध्यक्षपदी

Devendra Fadnavis : फडणवीस म्हणतील तेच होणार भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष

Pimpri-Chinchwad News : तीन वर्षांची मुदत संपल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली भाजपने सुरु केल्या आहेत. असे असले तरी पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्याकडे हे पद आताही कायम ठेवले जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेता शहर अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनाच कायम ठेवले जाईल, असे पक्षाच्या राज्य पातळीवरील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. त्याला पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनीही दुजोरा दिला. दरम्यान, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहाराध्यक्षपदाचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेणार आहेत. ते म्हणतील त्यांना हे पद स्वीकारावेच लागणार आहे, असे भाजपच्या गोटातून माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis, Mahesh Landge
Sanjay Raut : हक्कभंग नोटिशीला राऊतांचे सडेतोड उत्तर ; 'हा सत्ताधाऱ्यांचा डाव...'

दरम्यान, आमदार लांडगे यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद देऊ नये,अशी त्यांच्या हितचिंतकाचीच इच्छा आहे. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ घातला असून त्यासाठी आमदार लांडगे यांचे नाव चर्चेत आहे. किमान क्रीडा राज्यमंत्री तरी त्यांना केले जाईल, असा ठाम विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. त्यातून शहराचा मंत्रीपदाचा 'बॅकलॉग'ही त्यातून भरणार निघणार असल्याची त्यांची भावना आहे.

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) निवडणुकीच्या तोंडावर उद्योगनगरीला भाजप मंत्रीपद देण्याचीही शक्यता आहे. त्यासाठी आता फक्त लांडगे दोन टर्म आमदार असलेले एकमेव प्रबळ दावेदार आहेत. म्हणून त्यांच्या पाठीराख्यांना मंत्रीपद हवे आहे, तर अध्यक्षपद नको आहे. पुन्हा अध्यक्ष केले, तर 'एक व्यक्ती-एक पद' या न्यायाने आमदार लांडगेंना मंत्रीपदापासून वंचित ठेवले जाईल, अशी भीती समर्थकांना वाटत आहे. ती त्यांनी 'सरकारनामा'कडे बोलूनही दाखवली. म्हणून इतर कुणाही पात्र व्यक्तीला हे पद द्यावे. पिंपरी पालिकेत पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याची जबाबदारी आमची असे लांडगे यांच्या गोटातून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com