Old Pension and Employee Agitation : कर्मचाऱ्यांच्या 'ठिय्या'तून वाट काढत आयुक्त पोहचले पालिकेत

PCMC News : राज्य सरकारी कर्मचारी संप; पिंपरी महापालिकेचे कामकाज ठप्प
PCMC Employee Agitation
PCMC Employee Agitation Sarkarnama

One Mission-Old Pension : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुख्य मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून (ता. १४) राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. त्या संपात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) कर्मचारीही सहभागी झाले आहेत.

दरम्यान, संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगांची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांनी दिला होता. तो शिस्तभंग कारवाईच्या नोटीसलाही कर्मचाऱ्यांनी जुमानले नाही. परिणामी पालिकेचे कामकाज आज पूर्ण ठप्प झाले. मात्र,अत्यावश्यक सेवांचा अपवाद करण्यात आल्याने शहरवासियांची मोठी गैरसोय तूर्तास टळली आहे.

शंभर टक्के शिक्षक संपात सामील झाल्याने शहरातील महापालिकेच्या शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तर, वाहनचालकांचांही संपात सहभाग आहे. त्यामुळे पालिका प्रशासक तथा आयुक्तांसह इतर वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांना आज पालिकेच्या मोटारीऐवजी खासगी वाहनाने स्वतःच चालवित कार्यालयात यावे लागले. पालिकेचे आज बजेट असल्याने त्यांना मुख्यालयात येण्याशिवाय पर्याय नव्हता.

दरम्यान, पालिका मुख्यालयाच्या (PCMC) प्रवेशद्वारावरच मोर्चा काढून तेथे कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला होता. त्यामुळे वाहने दूर थांबवून आंदोलकांच्या गर्दीतून वाट काढत अधिकाऱ्यांना आत जावे लागले. 'एकच मिशन, जुनी पेन्शन' (One Mission-Old Pension) अशी घोषणा लिहिलेल्या आंदोलकांच्या टोप्या लक्ष वेधून घेत होत्या.

PCMC Employee Agitation
Farmer Suicide : राज्यात सात महिन्यात हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या या संपात २६ संघटना सहभागी झाल्या आहेत. राज्यातील २८ महापालिका आणि ३६९ नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे प्रतिनिधीत्व करणारी महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार संघटना फेडरेशननेही या संपात उडी घेतली आहे. मात्र, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे (Baban Zinjurde) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

यावेळी बबन झिंजुर्डे म्हणाले, "जुन्या पेन्शनप्रश्नी कमिटी नेमणे हा सरकारचा (State Goverment) वेळकाढूपणा आहे. सरकारने सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही संपात उतरतील. फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in