Sarkarnama Impact: ...अखेर राज्य सरकारला आली जाग,पूर्ण शास्तीमाफीचा जीआर काढणार

Pimpri Chinchwad : शिंदे-फडणवीस सरकारने या पोटनिवडणुकीत शास्तीमाफ केली असल्याचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा भाजपने बनवला आहे.
Pimpri-chinchwad News
Pimpri-chinchwad NewsSarkarnama

उत्तम कुटे

Shinde Fadnavis Government : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शास्तीकर रद्द करणार असल्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागूपर येथे २१ डिसेंबर २०२२ रोजी केली होती. मात्र,त्याला दोन महिने होऊनही त्याबाबत शासन आदेश (जीआर) अद्याप निघाला नसल्याची बातमी `सरकारनामा`ने परवा (दि.२१) दिली होती.

'सरकारनामा'च्या या बातमीची दखल खुद्द नगरविकास खाते असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच घेतली आहे. पूर्ण शास्तीमाफी घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच जीआर काढणार असल्याचे त्यांनी चिंचवडमध्ये गुरुवारी (दि.२२) सांगितले.

Pimpri-chinchwad News
Thackeray group : ‘गद्दार’, 'खोके' शब्द रुजविल्यानंतर ठाकरे गट पुन्हा आक्रमक ; पण, आमदारांची अनुपस्थिती..

चिंचवड पोटनिवडणुकीतील युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारसभेत त्यांनी हे आश्वासन दिले. मात्र, ते निवडणुकीतील जाहीरनाम्यासारखे ठरणार,तर नाही,ना अशी चिंता या समस्येने त्रस्त असलेल्या साडेचार लाख रहिवाशांना सतावते आहे.या पोटनिवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारने शास्तीमाफ केली असल्याचा प्रचाराचा मुद्दा भाजपने बनवला आहे.

फायरब्रॅण्ड नेत्या पंकजा मुंडे यांनीही १९ तारखेच्या प्रचार सभेत शास्तीमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे सांगितले होते. तर, भाजपच्या या श्रेयबाजीतील फोलपणा दाखवून देत त्यांचे हे आश्वासनाचे आणखी एक गाजर कसे ठरले आहे, हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी लगेचच त्याच दिवशी दाखवून दिले.

दरम्यान,पूर्ण शास्तीमाफीचा निर्णय घेणार असल्य़ाची घोषणा फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या दिवशीच (२१ डिसेंबर) १४ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांच्या मानेवर लटकत असलेली शास्तीकराची टांगती तलवार दूर झाल्याबद्दल भाजपने त्याचे लगेचच त्याच दिवशी श्रेय घेऊनही टाकले होते.

हिवाळी अधिवेशनातच पिंपरी-चिंचवडचा चाळीस वर्षे प्रलंबित साडेबारा टक्के जमिन परताव्याचा दुसरा प्रश्नही सुटल्याने भाजपने तेव्हाच आनंदोत्सव केला होता. हा परतावा येत्या १५ दिवसांत दिला जाईल,अशी घोषणा नगरविकास विभागाची जबाबदारी अधिवेशन काळात देण्यात आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत ३० डिसेंबर २०२२ रोजी केली होती.तो दोन महिन्यानंतरही अद्याप दिला गेलेला नाही. त्यामुळे हा प्रश्नही मार्गी लावू,असे आता मुख्य़मंत्र्यांना कालच्याच सभेत सांगावे लागले आहे.

Pimpri-chinchwad News
Ramdas Athawale : शरद पवारांनी 'ही' बाब अजितदादांना सांगायला हवी होती; रामदास आठवलेंचं मोठं विधान

या दोन्ही मुद्यांवरून या पोटनिवडणुकीत विरोधकांनी कोंडी केल्याने तसेच ते अडचणीचे ठरत असल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी सरकारनामाच्या वृत्तानंतर शहर भाजपमधील एका वजनदार नेत्याने मुख्यमंत्र्यांकडे केली होती.त्यातूनच त्यांनी काल या दोन्ही प्रश्नांबाबत आश्वासन दिले आहे. पण, आता या आश्वासनाची पूर्तता किती दिवसात होते,याकडे त्यामुळे त्रस्त असलेल्या काही लाख पिंपरी-चिंचवडकरांचे डोळे लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in