पोलिसांवरील हल्ले सुरूच...24 तासांत दुसरी घटना; आता पीएसआयला मारहाण

पोलिसांचा धाक कमी होत चालला आहे हे दर्शविणारी दुसरी घटना २४ तासांतच पिंपरी आयुक्तालयात घडली आहे.
police sub inspector assaulted by two youths in khed pune
police sub inspector assaulted by two youths in khed pune

पिंपरी : पिंपरी-चिंचवड व परिसरातील गुन्हेगारच नव्हे, तर तरुणही आता पोलिसांना जुमानत नसल्याचे समोर येत आहे. पोलिसांचा धाक कमी होत चालला आहे हे दर्शविणारी दुसरी घटना २४ तासांतच पिंपरी आयुक्तालयात (Pimpari Police) घडली आहे. एका टोळक्याने दिघी येथे पोलिसावर (Police) केलेल्या प्राणघातक हल्याला २४ तास उलटायच्या आत दुसरा हल्ला व तोही अधिकाऱ्यावरच झाला आहे. 

यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) सोमनाथ सुरेश झेंडे हे जखमी झाले आहेत. दोन तरुणांनी त्यांना मारहाण केल्याची ही धक्कादायक घटना खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव (ता.खेड,जि.पुणे) येथे बुधवारी (ता.२८) मध्यरात्री घडली.त्यातील दोन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. परमेश्वर सोनके या पोलिसाने एका गुन्ह्यात पकडल्याचा राग मनात धरून मंगळवारी (ता.२७) रात्री त्यांच्यावर दिघीत एका तरुणाने आपल्या साथीदारांसह दगडांचा वर्षाव करीत खुनी हल्ला केला होता. ते मोटारीत असल्याने तिचे नुकसान होऊन जखमी होण्यावर त्यांचे निभावले होते. 

आता लगेचच चाकण पोलीस ठाण्यातील सोमनाथ सुरेश झेंडे (वय ३५) या तरुण पोलीस अधिकाऱ्यावर बुधवारी (ता.२८) रात्री हल्ला झाला. खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या शेल पिंपळगावातील हॉटेल संतोषसमोर मध्यरात्री ही खळबळजनक घटना घडली. त्यात पोलीस उपनिरीक्षक झेंडे किरकोळ झाले. त्यांना ओठ व जीभेला जखम झाली. हा हल्ला करणाऱे अमर शंकर मोहिते (वय २९, रा. मोहितेवाडी, शेल पिंपळगाव, ता.खेड) आणि त्याचा साथीदार गणेश प्रकाश गुंडाळ (वय २८, रा. भोसे, चाकण, ता.खेड) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणून मारहाण करीत जखमी केल्याचा गुन्हा चाकण पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. त्यात या जोडगोळीला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याची माहिती तपासाधिकारी साईसागर बामणे यांनी 'सरकारनामा'ला दिली. 

झेंडे व पोलीस व्हॅनचालक वाळूंज हे बुधवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना आरोपी हे हॉटेल संतोषसमोर दिसले. म्हणून त्यांना झेंडेंनी एवढ्या रात्री काय करताय, असे विचारले. तसेच मास्क का घातला नाही, अशीही विचारणा केली. त्यावर आरोपींनी आम्ही स्थानिक आहोत, तुम्ही कोण विचारणार असे उर्मटपणे उलट पोलिसांनाच सुनावले. एवढेच नाही,तर शिवीगाळ करीत झेंडेची कॉलरसह गचांडी धरीत त्यांना धक्काबुक्कीही केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com