आमदार लांडगेंची शिष्टाई अन् पायी वारीवर ठाम बंडातात्यांची मोटारीतून वारी!

ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर हे पायी वारीवर ठाम होते. यात आमदार महेश लांडगेंची शिष्टाई यशस्वी ठरली आहे.
police detain banda tatya karadkar in karad over wari
police detain banda tatya karadkar in karad over wari

पिंपरी : चालायचंच नाही, हे नाही चालायचं, असे म्हणत पायी वारीवर ठाम असलेले ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (BandaTatya Karadkar) यांनी अखेर नरमाईची भूमिका घेतली. त्यांना मोटारीतून कऱ्हाडला नेण्यात आले आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांचीही मोठी चिंता मिटली. यात भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांची शिष्टाई महत्वाची ठरली. 

पायी वारीला सुरूवात केल्यामुळे पोलिसांनी बंडातात्या यांना सकाळी आळंदीजवळील दिघी येथील संकल्प मंगल कार्यालयात अप्रत्यक्ष स्थानबद्ध केले. हे समजताच भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी तेथे धाव घेतली. पायी चालणे हा गुन्हा असेल,तर तसे लाखो गुन्हे दाखल करा. सर्वसामान्यांचा पायी चालणे हा हक्क कोणतेही सरकार काढू शकत नाही अशी भूमिका बंडातात्यांनी घेतली होती. 

वारकरी आंदोलन करण्याची शक्यता असल्याने आमदार लांडगे यांनी प्रसंगावधानतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांना केले. आमदार लांडगे यांचे म्हणणे ऐकून बंडातात्यांनी नरमाईची भूमिका घेतली. नंतर त्यांना मोटारीतून पोलीस बंदोबस्तात कऱ्हाडला नेण्यात आले. तेथे त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. बंडातात्या यांना अटक केली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सहकार्याची भावना ठेवली पाहिजे. पालखी सोहळ्याला गालबोट लागणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दोन तासांच्या चर्चेनंतर अखेर बंडातात्यांनी मोटारीतून पंढरपूरला जाण्यास होकार दर्शवला. याआधीही त्यांनी संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी वारकऱ्यांना परवानगी द्यावी, यासाठी श्रीक्षेत्र देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलन केले होते. 

यासंदर्भात आमदार लांडगे म्हणाले की,राज्यात ७०० वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. प्रत्येकवर्षी आषाढी वारीसाठी पायी पालखी सोहळा निघतो. मात्र, गेल्या वर्षापासून कोरोनामुळे  तो होत नाही. मी स्वत: वारकरी कुटुंबातील आहे. बंडातात्यांच्या भावनेशी मी सहमत आहे. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com