PCMC Budget 2023 : पिंपरी-चिंचवड पालिकेचा अर्थसंकल्प : भाजपकडून कौतूक तर राष्ट्रवादीची टीका

Shekhar Singh : प्रशासकांच्या बजेटवरून भाजप-राष्ट्रवादीत रणकंदन
Mahesh Landge, Ajit Gavane
Mahesh Landge, Ajit GavaneSarkarnama

BJP vs NCP : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०२३-२४ चे बजेट आज सादर झाले. ते दिलासा देणारे सर्वसमावेशक असल्याची प्रतिक्रिया गत सत्ताधारी भाजपने दिली. तर ते निराशाजनक असल्याची टीका विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

PCMC पहिल्याच बजेटमध्ये आपली छाप न सोडलेले तसेच प्रशासकीय राजवटीत कामाचा ठसा उमटविण्यात अपयशी ठरलेले पालिका आयुक्त तथा प्रशासक आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाच्या नियोजनाचे भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी, मात्र बजेटबद्दल कौतूक केले आहे.

शहरातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे. भाजपच्या सत्ताकाळात प्रस्तावित प्रकल्पांना गती दिली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार लांडगे (Mahesh Landge) यांनी दिली.

सर्वस्तरातील नागरिकांचा या बजेटमध्ये विचार करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. पिंपरी-चिंचवडकर केंद्रबिंदू मानून ते सादर केल्याबद्दल त्यांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत.

शहरवासियांची निराशा

पिंपरी पालिकेचे बजेट हे शहरवासियांची निराशा करणारे असून त्यात एकाही नविन अथवा ठोस प्रकल्पाचा समावेश नाही. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले प्रकल्प चालू वर्षात सुरू राहतील, असा मुलामा त्यात लावण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या पाच वर्षांच्या राजवटीतील अपयशी प्रकल्पांची कबुलीच याद्वारे देण्यात आल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavane) यांनी केला.

या अर्थसंकल्पात नदीसुधार प्रकल्प, तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनीतील डोळ्यांचे रुग्णालय, पीपीपी तत्वावर कॅन्सर हॉस्पीटल, वेस्ट टू एनर्जी, महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, बायोगॅस प्रकल्प चालू वर्षात सुरू होतील, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात हे जुनेचे प्रकल्प असून त्याच्या वर्कऑर्डरही काढण्यात आल्या आहेत, याकडे गव्हाणेंनी लक्ष वेथले. त्यामुळे हे प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून रखडल्याचेच अधोरेखीत झाले आहे.

भाजपकडून जे प्रकल्प सुरू केल्याचा दावा सातत्याने केला जातो ते प्रकल्प अद्यापही रखडलेले आहेत, हेच प्रशासकांनी कबुल केले आहे. केवळ जुन्याच योजनांना मुलामा देऊन नव्याने सादर करण्यात आलेले हे अंदाजपत्रक असल्याने शहरवासियांची घोर निराशा झाल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com