Ajit Pawar : लोक उद्धव ठाकरेंनाच पाठिंबा देतील; अजित पवारांनी दिली देशभरातील उदाहरणे

Uddhav Thackeray : नेतृत्वाचा करीष्माच पक्षाला तारत असल्याचा विश्वासही केला व्यक्त
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Shivsena and ECI Result : लोक मजबूत नेतृत्वामागे जातात. देशात असे कितीतरी पक्ष फुटले, मात्र व्यक्तीचा करिष्माने पक्षाला तारले. इंदिरा गांधी, एन. टी. रामाराव, एम. जी. रामचंद्रन, आता नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासारखी उदाहरणे देशात आहेत. तसेच उद्धव ठाकरेही या प्रसंगाला सामोरे जातील. त्यांना मिळालेले चिन्ह लोकांपर्यंत पोहचवतील, असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.

Chinchwad by Poll Election विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आढवा घेण्यासाठी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) चिंचवड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवारांनी निवडणूक आयोगाचा निकाल अनपेक्षित असल्याचा पुनरोच्चार केला.

ते म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष मोठा केला. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी मराठी लोक, कष्टकऱ्यांना न्याय दिला. त्यानंतर मृत्यूपूर्वी त्यांनी शिवसेना पक्षाची सूत्रे मुलगा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे देतो. आता ज्यांनी शिवसेना पक्षात उभी फूट पाडली, त्यांच्याच हातात पक्ष दिला. हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. याविरोधात ठाकरे सुप्रिम न्यायालयात जाणार आहेत."

Ajit Pawar
N V Ramana : ठाकरे-शिंदे संघर्षांची सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीशांचा असा ही एक विक्रम !

यानंतर पवार यांनी अशा प्रकारच्या अनेक घटना देशात घडल्याचे सांगितले. मात्र मजबूत नेतृत्वाच्या करिष्म्याने नविन काढलेले पक्षच नंतर मोठे झाले. हे सांगताना त्यांनी इंदिरा गांधी, एन. टी. रामाराव, एम. जी. रामचंद्रन, आता नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, शरद पवार यांची उदाहरणे दिली.

Ajit Pawar
Shivsena : सत्ता गेली, पक्षाचे नाव अन् चिन्हही ; मग ठाकरेंच्या सैनिकांची एकजूट कायम राहील ?

अजित पवारांनी सांगितले की, पूर्वीच्या आंध्रप्रदेशात तेलगू देशम हा पक्ष एन. टी. रामाराव यांनी काढला. त्यांच्या निधनांतर त्यांचे जावाई चंद्रबाबू नायडू यांनी पुढे नेला. तामिळनाडूमध्ये डीएमके पक्ष होता. नंतर एम. जी. रामचंद्रन यांनी अण्णा डीएमके नावाचा पक्ष काढला. एमजीचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी जयललीता यांना प्रमुख केले. त्यानंतर जयललीता अनेकदा मुख्यमंत्री झाल्या. शेवटी पक्ष हा मजबूत नेतृत्वावर चालत असतो.

Ajit Pawar
Shah On Patil : ‘ये हर्षवर्धन मेरा सर खा जाता है हमेशा’ : ‘इथेनॉल’ फायनान्ससाठी लढणाऱ्या पाटलांचा शहांकडून भाषणात उल्लेख

काँग्रेसमध्ये गांधी-नेहरु घराण्याचा करिष्मा आहे, त्यावर काँग्रेस चाललेला आहे. आज भारतात नरेंद्र मोदींचा करीष्मा आहे, त्यामुळे भाजप सर्वदूरपर्यंत पोहचला आहे. भाजपला मोदींशिवाय पर्याय नाही. शरद पवार यांच्याकडे पाहून राष्ट्रवादी पक्ष चाललेला आहे.

शिवसेना पक्षही उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून उभा राहिला आहे. आज आलेला प्रसंगातून उध्दव ठाकरेंचं कर्तृत्व, नेतृत्व मार्ग काढेल. महाराष्ट्रात फिरून पक्षाची बांधणी करतील. त्यांना जे चिन्ह मिळेल, ते लोकांपर्यंत पोहचवतील. लोक त्यांना पाठिंबा देतील, असेही पवार यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in