थापा मारणा-या पालकमंत्र्याला जनता भूलणार नाही!

भाजपच्या एकनाथ पवारांची जीभ घसरली, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा केला एकेरी उल्लेख.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

पिंपरीः गेल्या अडीच वर्षापासून पिंपरी-चिंचवडमध्ये (Pune) दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. या पाणीप्रश्नाला पालिकेतील माजी सत्ताधारी भाजप (BJP) जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या मेळाव्यात केला होता. त्याचा समाचार घेताना भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार (Eknath Pawar) यांची जीभ घसरली. (BJP leader Eknath Pawar loose talk on Dy. CM Ajit Pawar)

Ajit Pawar
दरडोई उत्पन्नात बांगलादेशने भारताला मागे टाकले!

ते म्हणाले, राज्य सरकारने शहरासाठी भामा आसखेड व आंद्रा धरणातून मंजूर केलेले २६७ एमएलडी पाणी अजित पवारांना गेल्या पाच वर्षात आणता आले नाही. कारण त्यांच्या अंगातच पाणी नाही, ते काय दररोज पाणी देणार, असे आव्हान देत अजित पवारांनी भाजपला दिले होते. त्या टीकेचा समाचार भाजपचे पिंपरी महापालिकेतील माजी सत्तारुढ पक्षनेते आणि प्रदेश प्रवक्ते पवार यांनी घेतला आहे.

Ajit Pawar
भाजप नगरसेवक म्हणाले, `कार्यवाही होणार असेल तर भुंकतो`

ते म्हणाले, अजित पवार यांनाच पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी प्रश्न सोडविता आला नाही, असा प्रतिदावा एकनाथ पवार यांनी केला. महापालिकेत पंधरा वर्ष एकहाती सत्ता असताना पवना धरणातून थेट बंदिस्त पाईपलाईनमधून त्यांना पाणी आणता आले नाही. उलट शेतकरी आंदोलकांवर गोळीबार करुन त्यांचा जीव घेतला. त्यातील जखमींना पालिकेची नोकरी दिली नाही. लोकांनी पाणी मागितले, तेव्हा तुम्ही धरणात मुतण्याची भाषा केली. पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प गुंडाळून ठेवला. त्यामुळे करदात्यांचे २०० कोटी रुपये पाण्यात गेले. त्याला जबाबदार कोण? आहे.

ते पुढे म्हणाले, वरील कारणांमुळे पिंपरी-चिंचवडच्या जनतेला धमकीवजा इशारा देवून तुम्ही मला शंभर नगरसेवक द्या, मगच तुमचा पाणी प्रश्न सोडवण्याची भाषा करता, ही कुठल्या विकासकामाची पध्दत आहे, अशी तोफ भाजपच्या पवारांनी राष्ट्रवादीच्या पवारांवर डागली. तसेच उपमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करताना ``थापा मारणा-या पालकमंत्र्याला जनता कधीही भूलणार नाही``, असे एकनाथ पवार म्हणाले.

राष्ट्रवादीने जनतेला चोवीस तास पाण्याचे स्वप्न दाखवून फसविले असल्याचा प्रत्यारोप भाजपच्या पवारांनी केला. भाजपने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांचीच उद्घाटने उपमुख्यमंत्र्यानी काल केली, असा टोलाही त्यांनी लगावला. चोवीस तास पाणी देण्याचे स्वप्न दाखवून राष्ट्रवादीने पंधरा वर्ष सत्ता भोगली, पण नागरिकांना कधीही चोवीस तास पाणी दिले नाही. प्रशासकांच्या आडून शहरात कृत्रिम पाणी टंचाई दाखवून त्यांचे खापर ते भाजपवर फोडत आहेत. भाजपने आंद्राचे पाणी आणून पाणी प्रश्न सोडविला. आता भामा-आसखेडचे पाणी आणून तो ते पूर्ण मिटवणार आहेत. परंतू, पालिका निवडणूक आल्याने पालकमंत्र्यांना पिंपरी-चिंचवडचे प्रश्न दिसू लागले आहेत. त्यांनी दररोज पाणी देण्याचं आश्वासन दिलंय खऱं, पण त्याबदल्यात मला शंभर नगरसेवक निवडून देण्याचा दमवजा इशाराही दिला आहे, याकडे भाजपच्या प्रदेश प्रवक्तांनी लक्ष वेधले. ही दमदाटी पिंपरी-चिंचवडकर विसरणार नाहीत, असे ते म्हणाले.

भाजप २०१७ मध्ये पहिल्यांदाच महापालिकेत सत्तेत आली होती. गेल्या पाच वर्षात आम्ही शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. राष्ट्रवादीच्या काळात विकासापासून दूर असलेल्या समाविष्ट गावांतील मूलभूत प्रश्न सोडविण्याचा आम्ही प्रयत्न केला. परदेशातील प्रकल्पांच्या धर्तीवर उद्याने विकसित केली. रस्ते सिमेंट कॉंक्रींटचे करण्यात येत आहेत. शहरातील फूटपाथ, सायकल ट्रॅक, ज्येष्ठांना फूटपाथवर बसण्याची बैठक व्यवस्था केली. नवी ड्रेनेजलाईन टाकली. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शहरातील प्रमुख चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहर भयमुक्त व सुरक्षित राहण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करत प्रमुख चौकाचौकात सीसीटीव्ही बसविले आहेत.अशाप्रकारे विविध विकासकामे करुन शहरात विकासाची गंगा भाजपने आणली, असा दावा पवार यांनी केला. राष्ट्रवादीच्या १५ वर्षाच्या राजवटीत झाली त्यापेक्षा कितीतरी पट अधिक कामे केल्याचा दावाही त्यांनी ठोकला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com