PCMC News : पालिकेला सूचले उशिराचे शहाणपण; पाच बळी गेल्यानंतर अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई

Pimpri-Chinchwad : अनधिकृत बांधकामांवर आणखी दोन दिवस कारवाई
PCMC
PCMCSarkarnama

Pimpri-Chinchwad News : वादळी अवकाळी पावसाने या महिन्यात १७ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर सडकून टीका झाल्याने महापालिका प्रशानस खडबडून जागे झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकांनी आणि महापालिका प्रशासनाने आता या बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बांधकामांवर कारवाई सुरु केली आहे.

PCMC
PCMC News : पालिका आयुक्त भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागतात; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

पिंपरी पालिकेच्या (PCMC) या अतिक्रमण विरोधी धडक कारवाईत वड्याचे तेल वांग्यावरही निघाले.अनधिकृत होर्डिंग्जसह अतिक्रमण करणा-या हातगाड्या, टप-या,पत्राशेडवरही बुलडोझर फिरला. एका पालिकेसाठी इच्छूकाचेही जनसंपर्क कार्यालय यातून सुटले नाही. मात्र, माजी सत्ताधारी भाजपशी सबंधित इच्छुकांची कार्यालये कारवाईतून सुटल्याचे आरोपही शहरातून होत आहे.

PCMC
Narendra Modi : 'वॉरंटी' संपलेला पक्ष 'गॅरंटी' काय देणार?; पंतप्रधानांचा मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Pimpri-Chinchwad शहरातील सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयात अनधिकृत होर्डिंगवर गुरुवारी (ता. २७) मोठ्या बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. मात्र, ती यापूर्वीच व्हायला हवी होती. दुर्घटना घडल्यानंतर पालिकेला जाग आली. त्यामुळे पालिकेला उशिराचे शहाणपण सूचले, अशी चर्चा त्यावर ऐकायला मिळाली. शहरातील प्रमुख तसेच वर्दळीचे रस्ते निश्चित करून तेथील पदपथ, मुख्य चौक येथे बसणारे हातगाडी, पथारीवाले, टेम्पो यांच्यावर एकाच वेळी कारवाई करण्यात झाली.

PCMC
Jayant Patil News : राष्ट्रवादीत भाकरी फिरणार; जयंत पाटलांच्या जागी 'या' तीन नावांची चर्चा!

पाच बळी घेणारे होर्डिंग कोसळलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातच या कारवाईत सर्वाधिक बेकादेशीर होर्डिंग्ज काढण्यात आले. याच मतदारसंघात उन्हाळ्यात वाटसरुंसाठी ठेवण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे नऊ माठ आणि दोन रसवंतीगृहांवरही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अशीच कारवाई शुक्रवारी (ता. २८) आणि शनिवारी (ता. २९) करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com