पक्षादेश डावलणं भोवलं...शिवसेना गटनेत्याला राजीनामा देण्याचा आदेश - pcmc shiv sena leader rahul kalate asked to resign from post by party | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पक्षादेश डावलणं भोवलं...शिवसेना गटनेत्याला राजीनामा देण्याचा आदेश

उत्तम कुटे
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी मर्जीतील नगरसेविकेच नाव देणे शिवसेना गटनेत्याला भोवलं आहे. 

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी पक्षाची शिफारस डावलून स्वतः च्या मर्जीतील नगरसेविकेचे नाव देणं महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या अंगलट आले आहे. पक्षशिस्त भंग केल्याने त्यांना गटनेतेपदाचा तात्काळ राजीनामा देण्याचा आदेश शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज दिला. 

शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी याबाबत खुलासाही कलाटे यांच्याकडून सात दिवसाच्या आत मागवला आहे. तो समाधानकारक वाटला नाही, तर त्यांच्याविरुद्ध  कारवाई होण्याची शक्यता आहे. स्थायी सदस्य निवडीत पक्षादेशाचा भंग केल्याने गटनेतेपदाचा तात्काळ राजीनामा देण्याचा आदेश आहे,असे  शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी कलाटे यांना दूरध्वनीवरून सांगितले आहे. 

महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी १८ तारखेला आठ सदस्यांची निवड झाली.त्यात शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. परंतु, कलाटे यांनी पक्षादेश डावलून आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव दिल्याने त्यांच्या गटनेतेपदावर संक्रांत आली. 

गटनेतेपदी काम करत असताना स्वतःच्या मर्जीतील लोकांना पदे वाटून आपण पक्षशिस्तीचा भंग केला आहे. पक्षादेश न पाळता वेगळाच अजेंडा राबवत आहात.  त्यामुळे आपण महापालिका शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा त्वरित महापौर व विभागीय आयुक्तांकडे द्यावा. असा आदेश राऊत यांनी कलाटे यांना दिला आहे. तो शिवसेना सचिव अनिस देसाई यांनी बजावला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख