पिंपरी महापालिकेत नो मास्क, नो एंट्री ; मस्टरवरच हजेरी , बायो मेट्रीकला स्थगिती

तिसऱ्या लाटेने पुन्हा या ऑनलाईन उपस्थितीऐवजी ऑफलाईन हजेरीस आता सुरवात करण्यात आली आहे. बायो मेट्रीक उपस्थितीतून या महिनाअखेरपर्यंत सवलत देण्यात आली आहे.
pcmc
pcmcsarkarnama

पिंपरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पिंपरी-चिंचवडसह राज्यातही हाहाकार माजवला आहे. पंधरा दिवसांपूर्वी (ता. २९) शहरात फक्त ८७ नवे रुग्ण आढळले होते. बुधवारी (ता. १२) हा आकडा दोन हजारावर (२,०६५) गेला. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून त्यांनी महापालिका (Pimpri Municipal Corporation) मुख्यालयात अभ्यांगताना येण्यास आता मनाई केली आहे. ठेकेदारही त्याला अपवाद नाही. अपरिहार्य स्थितीत दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश तो ही सायंकाळी चार ते सहा या वेळेत दिला जाणार आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासात शहरात कोरोनाने आणखी एक बळी घेतला.त्यामुळे या बळींची संख्या आता चार हजार ५२८ झाली आहे. तर, दोन हजार ६५ नव्या रुग्णांची (त्यात एक ओमीक्रॉनचा) भर आज पडल्याने शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडा हजाराच्या घरात (९,४८६) गेला. त्यामुळे शासकीय, निमशासकीय व महापालिका कार्यालयातील अभ्यांतांच्या प्रवेशावर राज्य सरकारने ८ तारखेला लागू केलेला निर्बंध आदेश पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आपल्याकडे बंधनकारक केला आहे.

प्रत्यक्ष पालिकेत येण्याऐवजी मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी शहरवासियांनाा केले आहे. व्हीसीव्दारे विभागप्रमुखांनी समस्या सोडविण्यास त्यांनी सांगितले आहे. नो मास्क (No mask), नो व्हॅक्सिन, नो एंट्रीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरक्षा विभागास त्यांनी बजावले आहे.

दरम्यान,दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबरपासून पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा बायोमेट्रीक हजेरी (थंब इंप्रेशन आणि फेस रिडिंग) सुरु करण्यात आली होती. मात्र, तिसऱ्या लाटेने पुन्हा या ऑनलाईन उपस्थितीऐवजी ऑफलाईन हजेरीस आता सुरवात करण्यात आली आहे. बायो मेट्रीक उपस्थितीतून या महिनाअखेरपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

pcmc
'वर्क फॉम होम'साठी गुड न्यूज ; करातून सवलत अन् अलाऊन्स मिळणार

थंब इंप्रेशन व फेस रिडींगव्दारे हजेरी लावण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रांगा लागतात. त्यातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. आता पुन्हा हजेरीपत्रकावरच अधिकारी व कर्मचाऱ्यांना सह्या करून हजेरी नोंदवावी लागणार आहे. या जुन्या हजेरी पद्धतीत उशीरा येणाऱ्या व लवकर कार्यालय सोडणाऱ्यांची एक दिवसाची रजा खर्ची टाकण्याची कारवाई केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in