आमदार शेळकेंनी दोनच दिवसांत मिळवून दिला चार लाखांचा सरकारी चेक

मावळ तालुक्यातील शिरदे येथील बबुशा पांडुरंग कोकाटे (वय 23) या तरुणाच्या कुटुंबालाही मदत दिली गेली.
आमदार शेळकेंनी दोनच दिवसांत मिळवून दिला चार लाखांचा सरकारी चेक
MLA Sunil Shelke provided govt assistance of Rs 4 lakh in two days

पिंपरी : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा कोकण आणि घाटमाथ्यावरही जोरदार फटका बसला. त्यात पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील एक आदिवासी तरुण पुरात वाहून गेला. त्याच्या कुटुंबाला मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी सरकारी चार लाखांची मदत अवघ्या दोन दिवसांत मिळवून दिली. (MLA Sunil Shelke provided govt assistance of Rs 4 lakh in two days)

सरकारी मदत एवढ्या कमी कालावधीत तालुक्यात प्रथमच मिळाल्याने तिची चर्चा झाली. एक वेगळा पायंडा पाडत आमदारांनी स्वतही आर्थिक सहाय्य करीत आपदग्रस्त मृत तरुणाच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. मावळ तालुक्यातील शिरदे येथील बबुशा पांडुरंग कोकाटे (वय 23) या तरुणाच्या कुटुंबाला बुधवारी (ता.२८) ही मदत दिली गेली. कोकाटे या तरुणाचा गेल्या शुक्रवारी (ता.२३) गावाजवळील ओढ्याला आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.

हा तरूण सकाळी जनावरे चारण्यासाठी ओढ्यापलिकडे डोंगरावर गेला होता. संध्याकाळी परत फिरला, तेव्हा ओढ्याला पूर आला होता. जनावरे त्यातून पोहून पलीकडे गेली. मात्र, बबूशा हा पूरात वाहून गेला. जनावरे आली, बबूशा न आल्याने त्याचे कुटुंबीय धास्तावले. त्यांनी कामशेत पोलीस स्टेशनला धाव घेतली. दरम्यान, तीन दिवसानंतर त्याचा मृतदेह  पाण्यावर तरंगताना आढळून आला. 

आदीवासी गरीब कुटुंबातील कर्ता तरुण अकाली गेल्याने कोकाटे कुटुंबावर जणू काही आभाळ कोसळले होते. त्यांच्या दुर्गम गावात जाऊन आमदारांचे बंधू सुधाकर यांनी स्वत: पाहणी केली. कोकाटेंची हलाखीची परिस्थिती पाहून शासकीय मदत मिळवून देण्याचे प्रयत्न त्यांनी युद्धपातळीवर लागलीच सुरु केले.

सरकारी काम आणि आठ दिवस थांब असे म्हटले जाणाऱ्या लाल फितीचा कारभार आमदारांनी याप्रकरणी स्वत: त्यात लक्ष घातल्याने तो हालला. त्यामुळे जेमतेम दोन दिवसांत बुधवारी (ता.२८) पिडीत कुटुंबाला वडगाव मावळ तहसील कार्यालयात तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या हस्ते चार लाख रुपयांच्या सरकारी आर्थिक सहाय्याचा धनादेश  देण्यात आला. 

त्याव्यतिरिक्त आमदार सुनिल शेळके युवा मंचच्या वतीने आर्थिक मदतीचा दुसरा स्वतंत्र धनादेश बबूशाच्या कुटुंबाला दिला गेला. यावेळी सुधाकर शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, ज्ञानेश्वर लक्ष्मण कोकाटे, सरपंच दिलीप बगाड, पोलीस पाटील हिराताई बगाड, तलाठी सुरेखा माने आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in