कार्यकर्त्यामुळे वाचले आमदार अण्णा बनसोडे; हल्लेखोराला धक्का दिल्याने चुकला नेम

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात झालेला गोळीबार हा तात्कालिक व क्षुल्लक वादातून झाल्याचे समजते आहे.
mla anna bansode attacked in pimpari due to small scuffle
mla anna bansode attacked in pimpari due to small scuffle

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  पिंपरीचे (Pimpari) आमदार अण्णा बनसोडे (MLA Anna Bansode) यांच्या कार्यालयात आज दुपारी झालेला गोळीबार (Firing)  हा तात्कालिक व क्षुल्लक वादातून झाल्याचे समजते आहे. तापट स्वभावाचा माजी जवान तानाजी पवारला शिवीगाळ करण्यात आल्यामुळे संतापून त्याने गोळ्या झाडल्या. या वेळी आमदारांच्या दिशेने त्याने गोळी झाडताना त्याला कार्यकर्त्याने धक्का दिला. त्यामुळे तो पडल्याने नेम चुकला आणि पुढील अनर्थ टळला. 

ही घटना घडली त्यावेळी आमदारांचा पिस्तुलधारी अंगरक्षक पोलीस जेवायला गेला होता. नाही,तर गोळीला उत्तर गोळीने मिळाले असते,अशीही चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळाली. या गोळीबारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या अॅन्थोनी नावाच्या पालिकेच्या ठेकेदाराकडे दोन मुले कामाला ठेवण्यातून ही घटना घडली. 

माजी जवान असलेला पवार हा या ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करीत आहे. दहा  दिवसांपासून आमदारांचे पीए त्याला दोन मुले कामावर घेण्यासाठी संपर्क करीत होते. या प्रकरणी पवार याने आमदारांशी फोनवर बोलताना अरेरावीची भाषा वापरली होती.  त्यानंतर आज तो आमदार बनसोंडेना भेटायला आला. त्यावेळी त्याचा मेहुणा आणि आणखी एक साथीदार त्याच्याबरोबर होता. त्यांच्याशी आमदारांनी चर्चा केली. नंतर आमदारांनी जाऊ दे असे सांगून प्रकरणावर पडदा टाकला. 

यानंतर आमदार हे केबिनमधून बाहेर पडल्यानंतर पवारचा बाहेरच्या खोलीत असलेल्या कार्यकर्त्यांशी वाद झाला. त्यातून त्याला शिवीगाळ झाल्याने त्याने गोळ्या झाडल्या. त्यावेळी कार्यकर्त्याने त्याला खाली पाडल्याने त्याचा नेम चुकला. यामुळे या हल्ल्यातून आमदार बचावले. 

पवार याला पकडून पोलिसांच्या हवाली त्याला करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. शहरातील कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोत नेण्याचे काम दोन ठेकेदारांना देण्यात आले आहे. त्यातील एक बीव्हीजी कंपनी,तर दुसरा अॅन्थोनी हा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com