Lampi : बैलपोळ्यावर सावट, काळजीपूर्वक साजरा करण्याचे शेळकेंचे आवाहन!

Lampi : पिंपरी चिंचवडमध्ये लम्पी आजाराने पाच जनावरांना प्रादुर्भाव..
Lampi News
Lampi NewsSarkarnama

पिंपरी : लम्पी आजारामुळे सध्या शेतकरी संकटात आहे. जनावरांवर लम्पी आजाराचा परिणाम होत आहे. अनेक जनावरे लम्पी आजाराने बाधित आहेत. या पार्श्वभूमीवर आता येत्या रविवारच्या (ता.२५) बैलपोळ्यावर लम्पीचे सावट दिसून येत आहे. परिणामी हा सण काळजीपूर्वक साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील बैल, गाय अशा प्राण्यांवर परिणाम करणारा हा आजार आता शहरातही पोचला आहे‌. पिंपरी चिंचवडमध्ये लम्पी आजाराने पाच जनावरांना प्रादुर्भाव झाल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आज पशुवैद्यकीय विभागाची बैठक घेतली. त्यात या आजाराचा प्राण्यांच्या पाच किलोमीटर परिसरातील गोवंशीय प्राण्यांचे लसीकरण करण्याचे ठरले. शहरात गोवंशीय प्राण्यांची संख्या ३ हजार पाचशे आहे. गोशाळा, पांजरपोळ, गोठे येथे सर्वेक्षण करण्यात येऊन तो परिसर निर्जंतुकीकरण केला जाणार आहे‌. तसेच लम्पी विषाणूबाबत चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, पशुवैद्यकीय विभागाचे उप आयुक्त सचिन ढोले यांनी यावेळी दिली. 

Lampi News
'ग्रामपंचायतीचे निकाल म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारवरचा जनतेचा विश्वास'

दरम्यान, मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी या रोगाच्या उपाययोजना व सद्यस्थितीबाबत तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची वडगाव मावळ येथे बैठक घेऊन माहिती घेतली. यावेळी बैलपोळा काळजीपूर्वक साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील १५५४३ जनावरांचे लसीकरण झाले असून, लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणावर लस उपलब्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in