#FriendshipDay लक्ष्मणभाऊ आणि विलासशेठ राजकारणापल्याडची अतूट मैत्री मैत्री

राजकारणात भाऊ आणि शेठ यांच्या पक्षातून विस्तव जात नाही. मात्र, या दोघांतच नव्हे,तर त्यांच्या कुटुंबात तेवढीच शीतलता आहे. नात्याचे आवरणही त्याला आहे. नात्यात आणि मैत्रीतही दुरावा येतो. पण ते या दोघांच्या बाबतीत घडलेले नाही. त्यांनी तो येऊ दिला नाही.उ लट हा स्नेह बळकट होऊन तो आणखी कसा वाढेल, याकडे ते लक्ष देत आहेत. त्यामुळेच तब्बल तीन पिढ्यांपासूनच्या या दोन घराण्यातील नातेसंबध टिकून आहेत.
#FriendshipDay लक्ष्मणभाऊ आणि विलासशेठ राजकारणापल्याडची अतूट मैत्री मैत्री
Laxman Jagtap Vilas Lande

पिंपरी : भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व राष्ट्रवादीचे या शहरातील ज्येष्ठ नेते व भोसरीचे माजी आमदार विलासशेठ लांडे-पाटील हे दोघे कट्टर राजकीय विरोधी पक्षाचे असले, तरी त्यांची मैत्रीही तशीच कट्टर आहे. त्यांची ही  राजकारणापल्याडची मैत्री वर्षानुवर्षे टिकून असून उलट ती आणखी घट्ट झाली आहे.  

राजकारणात भाऊ आणि शेठ यांच्या पक्षातून विस्तव जात नाही. मात्र, या दोघांतच नव्हे,तर त्यांच्या कुटुंबात तेवढीच शीतलता आहे. नात्याचे आवरणही त्याला आहे. नात्यात आणि मैत्रीतही दुरावा येतो. पण ते या दोघांच्या बाबतीत घडलेले नाही. त्यांनी तो येऊ दिला नाही.उ लट हा स्नेह बळकट होऊन तो आणखी कसा वाढेल, याकडे ते लक्ष देत आहेत. त्यामुळेच तब्बल तीन पिढ्यांपासूनच्या या दोन घराण्यातील नातेसंबध टिकून आहेत. एवढेच नाही, तर या आजी,माजी आमदारांनी त्याला मैत्रीची झालर लावली आहे. पुढे ती त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांपर्यंतही झिरपवली आहे. एक जुनला लांडे यांचा वाढदिवस होता. त्यावेळी जगताप हे आवर्जून उपस्थित होते. दर वाढदिवसाला ते एकमेकांना पेढे भरवितात. एकमेकांच्या सुखदुखात सामील होतात. ती ते दोघेही शेअर करतात. 

आज जागतिक मैत्रीदिन. त्यानिमित्त लांडे-पाटील यांनी आपल्या या राजकारणापलिकडील मैत्रीला उजाळा दिला. ते म्हणाले, ''आमच्या मैत्रीच्या आड राजकारण कधी येत नाही. आले नाही. तसेच येणारही नाही. राजकारणात ते आपल्या जागी व मी आपल्या जागी आहे. ते त्यात मोठे झाल्याचा मला आनंद होतो. तर, मी मोठा झाल्यानंतर ते आनंदित होतात. राजकारणापलिकडे एकमेकांना मदत करतो. चांगले वाईट सांगतो. पत्नीनंतर याच मित्राचा सल्ला घेतो. आमचे वडील त्यांची शेती करायचे. अद्यापही त्यांची पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात पिंपळे गुरव येथे शेती आहे.

जगताप यांनीही लांडे यांच्यासारखीच भावना व्यक्त केली. आमची मैत्री निपक्ष आहे. असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ''आमच्या मैत्रीच्या एक नाही, तर असंख्य आठवणी आहेत. एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होण्याच्याही अनेक घटना आहेत. नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून जात असतो. कितीही राजकारण केले वा झाले, तरी आमच्या मैत्रीत फरक पडणार नाही. वरचेवर तसे आम्ही भेटतो. भेट झाली नाही, तर फोन करतो. जीवनातील अनेक चढउतार पाहूनही आमची मैत्री दोस्ती व निष्ठा कायम आहे. उलट ती दिवसागणिक वाढतेच आहे."

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in