नितीन लांडगे लाचखोरीत सापडणे, हे पिंपरीचे दुर्दैव : अजित पवार

पिपरी स्थायीच्या टक्केवारीत पक्षाचा कोणी दोषी आढळला,तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
नितीन लांडगे लाचखोरीत सापडणे, हे पिंपरीचे दुर्दैव : अजित पवार
Ajit Pawer (13).jpg

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगर महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे हे लाचखोरीत पकडले जाणे हे शहराचे दुर्दैव असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. पक्षाचे असे कुणी चुकीचे वागले, तर मी लगेच लगेच कारवाई करतो,असे सांगत त्यांनी  लांडगेंवर अद्याप कारवाई न केलेल्या भाजप व त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना आज (ता.३) पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष्य केले.  (Finding Nitin Landage in bribery is the misfortune of Pimpri : Ajit Pawar)

दरम्यान,पिपरी स्थायीच्या टक्केवारीत पक्षाचा कोणी दोषी आढळला,तर त्याच्यावर कारवाई केली जाईल,असेही त्यांनी यावेळी सांगितल्याने स्थायीतील राष्ट्रवादीच्य़ा चार सदस्यांचे धाबे दणाणले आहे.

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर अध्यक्ष, तर त्यांचे बंधू शिवसेनेचे माजी नगरसेवक मधुकर बाबर उपाध्यक्ष असलेल्या श्री. गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या चिंचवड येथील नूतन वास्तूचे फीत कापून पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले. बाबर कुटुंबियांनी मोठ्या कष्टाने ही बॅंक उभी केली आहे, या शब्दांत त्यांनी कौतूक केले.जनतेचा कष्टाचा व मोठ्या विश्वासाने ठेवलेल्या पैशाचे चुकीचे वाटप होऊ नये,असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. त्यानंतर मिडीयाशी बोलताना त्यांनी भाजप व त्यांच्या प्रदेशाध्यक्षांवर शरसंधान केले. दरम्यान,पालकमंत्री या नात्याने अजितदादांना या कार्यक्रमाला बोलावल्याचा खुलासा  गजाजन बाबर यांनी `सरकारनामा`शी बोलताना केला.
   
पिंपरीसह राज्यातील दहा महापालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा आऱाखडा तयार  करण्याचे आदेश राज्य निवडणूक आय़ोगाने नुकतेच दिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक एक सदस्य प्रभागाने होईल,असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर, ही निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने व्हावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. म्हणून त्याबाबत विचारणा केली असता किती सदस्यीय वार्ड रचना करायची याबाबत निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असे सांगत याबाबतचा चेंडू त्यांनी हुषारीने मुख्यमंत्र्यांकडे टोलवला. केंद्र सरकारकडून मोठ्या बँकामध्ये छोट्या बँक विलीन करण्याचे धोरण सुरु आहे, पण त्याला विरोध होत असल्याने ते हे धोरण आक्रमकपणे राबवत नाहीत. पण सहकारी बँका व्यवस्थित चालवल्या पाहिजेत. त्यांनी विश्वासार्हता टिकवली पाहिजे. तरच या बँका टिकतील, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.सहकारी बँक इतर राष्ट्रीय बँकांच्या तुलनेत सर्वसामान्याना जवळच्या वाटतात यामगील कारण सांगताना राष्ट्रीय बँकांमध्ये सर्वसामान्यांना सहकारी बँकेत जशी वागणूक मिळते तशी मिळत नाही, असे ते म्हणाले. सहकारी बँकांकडून पीक कर्जवाटप 100 टक्क्यांहून अधिक होते,ते राष्ट्रीय बँकांकडून होत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Related Stories

No stories found.